
China Artificial Intelligence : चीनच्या DeepSeek या स्टार्टअपने नुकत्याच लाँच केलेल्या एआय मॉडेल्समुळे टेक्नॉलॉजी जगात धुमाकूळ घातला आहे. हे मॉडेल्स आपल्या किमतीच्या तुलनेत अमेरिका येथील सर्वात प्रचलित एआय मॉडेल्सपेक्षा अधिक कार्यक्षम आणि सुस्पष्ट असल्याचा दावा करण्यात आले आहे, ज्यामुळे टेक्नॉलॉजी क्षेत्रातील सध्याच्या स्थितीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
DeepSeek-V3 या मॉडेलच्या प्रशिक्षणासाठी केवळ 6 मिलियन डॉलर्सपेक्षा कमी खर्च आल्याचा दावा कंपनीने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या एका कागदपत्रात केला. यामुळे गुगल, मेटा आणि NVIDIA सारख्या अमेरिकन टेक कंपन्यांच्या वर्चस्वावर परिणाम होऊ शकतो. DeepSeek-V3 वर आधारित DeepSeek चा एआय असिस्टंट हा Apple च्या App Store मध्ये उपलब्ध असलेल्या ChatGPT ला मागे टाकत अमेरिकेतील सर्वाधिक रेटेड आणि फ्री अॅप बनला आहे.
चीनच्या तंत्रज्ञान कंपन्यांनी 2022 मध्ये OpenAI च्या ChatGPT च्या लाँच नंतर एआय चॅटबॉट्स तयार करण्याची होड लावली. मात्र, चीनमधून सुरुवातीला आलेल्या एआय चॅटबॉट्सची गुणवत्ता आणि कार्यक्षमतेत अमेरिकी मॉडेल्सच्या तुलनेत मोठा फरक दिसून आला. DeepSeek ने याला आपल्या मॉडेल्सच्या कार्यक्षमतेने आणि कमी खर्चाच्या संरचनेने पूर्णपणे उलटवले. DeepSeek-V3 आणि DeepSeek-R1 हे दोन्ही मॉडेल्स OpenAI आणि मेटाच्या अत्याधुनिक मॉडेल्सच्या तुलनेत कार्यक्षम आहेत आणि त्यांचा वापर करणंही खूप स्वस्त आहे. DeepSeek-R1 हे OpenAI च्या o1 मॉडेलच्या तुलनेत 20 ते 50 पट कमी खर्चिक असल्याचा दावा कंपनीने केला आहे.
काही तज्ज्ञांनी DeepSeek च्या यशावर शंका व्यक्त केली आहे. उदाहरणार्थ, Scale AI चे CEO Alexandr Wang यांनी दावा केला की DeepSeek कडे 50,000 Nvidia H100 चिप्स आहेत, जे अमेरिकेने चीनला विकण्यावर बंदी घातली आहे. पण DeepSeek ने या आरोपावर अद्याप स्पष्टपणे प्रतिक्रिया दिली नाही.
DeepSeek च्या मागे असलेल्या व्यक्तीबद्दल सांगायचं तर, याचे संस्थापक Liang Wenfeng हे एक क्वांटिटेटिव हेज फंड High-Flyer चे सहसंस्थापक आहेत. 2023 मध्ये, High-Flyer ने त्याच्या WeChat खात्यावर जाहीर केले की त्यांनी "AGI" (आर्टिफिशियल जनरल इंटेलिजन्स) च्या संशोधनावर लक्ष केंद्रित करण्यासाठी एक स्वतंत्र संशोधन गट सुरु केला आहे. त्याच वर्षी DeepSeek ची स्थापना करण्यात आली.
DeepSeek च्या यशाचे चीनच्या राजकीय वर्तुळातही लक्ष वेधले गेले आहे. 20 जानेवारी रोजी, जेव्हा DeepSeek-R1 सार्वजनिकपणे लाँच करण्यात आले, तेव्हा संस्थापक Liang यांनी चीनच्या पंतप्रधान Li Qiang यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या एका बंद दरवाजांच्या सत्रात भाग घेतला. या घटनामुळे असे संकेत मिळत आहेत की, DeepSeek चा यश चीनच्या धोरणात्मक उद्दिष्टांसाठी महत्त्वपूर्ण ठरू शकतो, ज्यामध्ये अमेरिकेच्या निर्यात नियंत्रणांचा सामना करणे आणि एआय सारख्या रणनीतिक उद्योगांमध्ये आत्मनिर्भरता मिळवणे हे समाविष्ट आहे.
संपूर्ण एआय क्षेत्रातील हा बदल चीनच्या तंत्रज्ञान क्षेत्रासाठी आणि जागतिक स्तरावर एक महत्त्वाची वळणाची गोष्ट ठरू शकतो. DeepSeek ने जे निर्माण केले आहे, ते एक मोठा गेम चेंजर ठरू शकतो, ज्यामुळे भविष्यात एआयच्या विकासाची दिशा आणि त्याच्या वापरातील क्रांतिकारी बदल दिसून येऊ शकतात.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.