Popcorn Brain : सोशल मीडियामुळे पसरतोय 'पॉपकॉर्न ब्रेन' आजार; काय आहेत लक्षणं अन् कसा करायचा बचाव?

Short Video : टिकटॉक या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मने सगळ्यात आधी शॉर्ट व्हिडिओंचा फॉरमॅट समोर आणला होता. हा प्लॅटफॉर्म कित्येक देशांमध्ये बॅन झाला आहे.
Popcorn Brain Explained
Popcorn Brain ExplainedeSakal

What is Popcorn Brain Disorder : लोकांना एकमेकांशी कनेक्टेड राहता यावं, आणि काही काळ विरंगुळा व्हावा या उद्देशाने सोशल मीडिया सुरू झाला होता. मात्र आता जगभरातील लोकांना सोशल मीडियाचं व्यसनच लागलं आहे. यामुळेच कित्येक मानसिक आणि शारीरिक आजारांना देखील निमंत्रण मिळत आहे. 'पॉपकॉर्न ब्रेन' हा नवा आजारही सोशल मीडियामुळे पसरत असल्याचं रिसर्चमध्ये समोर आलं आहे.

टिकटॉक या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मने सगळ्यात आधी शॉर्ट व्हिडिओंचा फॉरमॅट समोर आणला होता. हा प्लॅटफॉर्म कित्येक देशांमध्ये बॅन झाला आहे. टिकटॉकनंतर इन्स्टाग्राम आणि यूट्यूबनेही शॉर्ट व्हिडिओंचा फॉरमॅट कॉपी केला होता. यानंतर लोकांच्या दैनंदिन सोशल मीडिया वापरात भरमसाठ वाढ झाल्याचं कित्येक रिसर्चमध्ये समोर आलं आहे. (Social Media and Mental Health)

काय आहे पॉपकॉर्न ब्रेन?

जर तुम्ही दररोज सोशल मीडियाचा वापर करता, आणि तुम्हाला एखाद्या कामात अधिक वेळ फोकस करता येत नसेल; तर तुम्हाला पॉपकॉर्न ब्रेन आजाराची लागण झालेली असण्याची शक्यता आहे. 2011 साली यूडब्ल्यूआय स्कूलमधील संशोधकांनी ही टर्म समोर आणली होती. (Popcorn Brain)

Popcorn Brain Explained
Digital Detox : मोबाईल-सोशल मीडियामुळे बिघडतंय मानसिक आरोग्य; सरकार राबवणार 'डिजिटल डीटॉक्स' मोहीम

डिजिटल जगात एकाच वेळी अनेक विंडो ओपन करून, वारंवार स्क्रोल करून व्यक्तीचे विचार स्थिर राहत नाहीत. परिणामी खऱ्या जगातही एका गोष्टीवर अधिक वेळ फोकस करणं शक्य होत नाही. आपले विचार कढईतील पॉपकॉर्नप्रमाणे इकडे-तिकडे उडू लागतात, म्हणूनच या आजाराला पॉपकॉर्न ब्रेन असं नाव दिलं आहे. (Social Media attention span)

दीर्घकालीन आजार घातक

पॉपकॉर्न ब्रेनची लक्षणं दीर्घ काळापर्यंत राहिली, तर त्याचा व्यक्तीच्या स्मरणशक्तीवर आणि लर्निंग स्किलवर देखील गंभीर परिणाम होऊ शकतो. सोबतच नैराश्य, अति चिंता असे आजार होण्याचीही भीती यामुळे निर्माण होते. यामुळे वेळीच यावर उपाययोजना करणं गरजेचं आहे.

Popcorn Brain Explained
Chakshu Portal : ऑनलाईन गुन्ह्यांवर राहणार सरकारची 'नजर'; तक्रार करण्यासाठी लाँच केले दोन नवीन प्लॅटफॉर्म.. जाणून घ्या

असा करा बचाव

पॉपकॉर्न ब्रेनचा धोका कमी करून, एकाग्रता वाढवण्यासाठी काही गोष्टी करणं गरजेचं आहे..

  • डिजिटल डीटॉक्स - आठवड्यातून एकदा किंवा दिवसातून काही तास सोशल मीडिया किंवा डिजिटल उपकरणांपासून दूर राहण्याचा प्रयत्न करा.

  • सिंगलटास्किंग - एकाच वेळी अनेक कामे करण्याऐवजी, एकाच कामावर लक्ष द्या. हातातील काम पूर्ण झाल्यावर पुढील काम करायला घ्या.

  • मेडिटेशन - डिजिटल डीटॉक्स करताना मोबाईल किंवा इतर उपकरणे बाजूला ठेऊन मेडिटेशन करण्याचा प्रयत्न करा. या वाचलेल्या वेळात तुम्ही योग किंवा व्यायामही करू शकता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com