
ट्रुथ सोशल हे डोनाल्ड ट्रम्प यांनी 2022 मध्ये सुरू केलेले मायक्रो-ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म आहे, जे अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर केंद्रित आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मार्च 2025 मध्ये ट्रुथ सोशलवर प्रवेश करून ट्रम्प यांच्यासोबतचा फोटो शेअर केला.
आर्थिक अडचणी असूनही, ट्रम्प समर्थकांमध्ये ट्रुथ सोशल लोकप्रिय आहे, पण त्याची वापरकर्ता संख्या मर्यादित आहे
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे नाव आणि त्यांचे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्रुथ सोशल सध्या चर्चेत आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच या व्यासपीठावर प्रवेश केल्याने याची लोकप्रियता आणखी वाढली आहे. फेब्रुवारी 2022 मध्ये ट्रम्प यांनी ट्रम्प मीडिया अँड टेक्नॉलॉजी ग्रुप (TMTG) अंतर्गत लॉन्च केलेले हे मायक्रो-ब्लॉगिंग व्यासपीठ आहे. याचा इंटरफेस X (पूर्वीचे ट्विटर) सारखा आहे, जिथे पोस्टला ‘ट्रुथ्स’, रिपोस्टला ‘रिट्रुथ्स’ आणि जाहिरातींना ‘स्पॉन्सर्ड ट्रुथ्स’ म्हणतात. (what is truth social)