esakal | कारखान्यांच्या छतावर का लावले जातात गोल घुमट?
sakal

बोलून बातमी शोधा

कारखान्यांच्या छतावर का लावले जातात गोल घुमट?

कारखान्यांच्या छतावर का लावले जातात गोल घुमट?

sakal_logo
By
शर्वरी जोशी

आपल्या सभोवताली आपण असंख्य गोष्टी पाहत असतो. यातील काही निसर्गनिर्मित असतात. तर, काही मानवनिर्मित. यात बऱ्याचदा अशाही गोष्टी असतात, ज्या आपण दररोज पाहतो. मात्र, त्या वस्तूंचा नेमका उपयोग काय किंवा त्यांची निर्मिती का करण्यात आली आहे या मागचं कारण आपल्याला माहित नसतं. यामध्येच प्रत्येकाने मोठमोठ्या कारखान्यांच्या छतावर गोल फिरणारे घुमट (Turbo air Ventilator) पाहिले असतील. मुंबईत तर अनेक ठिकाणी हे सहज पाहायला मिळतात. स्टेनलेस स्टीलपासून तयार केलेले हे घुमट सकाळपासून संध्याकाळपर्यंत दररोज गोल फिरत असतात. परंतु, हे घुमट कारखान्यांच्या छतावर का लावतात किंवा त्याचा फायदा काय हे फार कमी जणांना माहित असेल, म्हणूनच या गोल घुमटांचा वापर नेमका कशासाठी केला जातो ते पाहुयात. (what is turbo air ventilator roof ventilators know how its work)

हेही वाचा: सतत गुळण्या करताय? अतिरेकही ठरु शकतो त्रासदायक

कारखान्यांच्या छतावर दररोज फिरणाऱ्या या गोल घुमटांना टर्बो व्हेंटिलेटर (Turbo air Ventilator) म्हणतात. हे व्हेंटिलेटर वेगवेगळ्या प्रकारचे असतात. यांना एअर व्हेंटिलेटर (Air Ventilator), टर्बाइन व्हेंटिलेटर (Turbine Ventilator), रुफ एक्सट्रॅक्टर (Roof Extractor) असंही म्हटलं जातं.

टर्बो व्हेंटिलेटर (Turbo air Ventilator) का लावले जातात?

कारखाने, गोदाम यासारख्या ठिकाणी आढळून येणारे व्हेंटिलेटर कारखान्यातील वा गोदामातील गरम हवा बाहेर फेकण्याचं काम करतात. सोबतच, वातावरणातील नैसर्गिक हवा या व्हेंटिलेटरच्या माध्यमातून आत खेचली जाते. ज्यामुळे कारखान्यातील हवा खेळती राहते. कारखान्यातील गरम हवा बाहेर फेकण्यासोबतच कारखान्यात येणारा उग्र दर्पदेखील बाहेर फेकला जातो.