iPhone 5G : आयफोनमध्ये 5G चालत नसेल तर काय कराल ?

प्रत्येक सेल फोन कॅरिअर 5G ला सपोर्ट करत नाही. त्याचवेळी, 5G सेवा अद्याप अनेक भागात उपलब्ध करून देण्यात आलेली नाही.
iPhone 5G
iPhone 5Ggoogle

मुंबई : देशभरात 5G चा विस्तार केला जात आहे. हे एक वायरलेस तंत्रज्ञान आहे जे वापरकर्त्यांना फास्ट स्पीड देते. तसे, 5G देशाच्या अनेक भागांमध्ये आणले गेले आहे.

काही शहरांमध्ये 5G उपलब्ध आहे पण काहीजणांना ते वापरता येत नाही. ही समस्या आयफोनमध्ये येत असेल तर काय करावे हे पाहू या. हेही वाचा - योग्य वेळेतच करा इच्छापत्र आणि व्हा चिंतामुक्त

iPhone 5G
Apple Jobs : अॅपल उघडणार भारतातील पहिले रिटेल स्टोअर; कर्मचाऱ्यांची होणार भरती

तुमचा iPhone 5G ला सपोर्ट करतो का ?

सर्वप्रथम, तुमचा iPhone 5G ला सपोर्ट करतो की नाही हे तपासावे लागेल. फक्त iPhone 12 किंवा नवीन मॉडेल 5G ला सपोर्ट करतात. तुम्हाला कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवर 5G ला सपोर्ट करणाऱ्या iPhones ची यादी मिळेल.

तुमच्या टेलिकॉम ऑपरेटरने 5G सेवा सुरू केली आहे का ?

प्रत्येक सेल फोन कॅरिअर 5G ला सपोर्ट करत नाही. त्याचवेळी, 5G सेवा अद्याप अनेक भागात उपलब्ध करून देण्यात आलेली नाही. जर तुमच्या क्षेत्रात 5G सुरू केले नसेल तर तुम्हाला 5G सक्षम डिव्हाइस असूनही 5G सेवा मिळणार नाही.

जर तुमच्याकडे 5G सक्षम फोन असेल आणि तुमचा ऑपरेटर देखील 5G ​​प्रदान करत असेल, तर तुम्हाला तुमच्या मोबाईल फोनमध्ये 5G डेटा आहे का ते तपासावे लागेल. जर असे झाले नाही तर तुम्ही 5G सेवा वापरू शकणार नाही.

तुमच्या फोनवर 5G आहे का ?

तुम्हाला तुमच्या iPhone मध्ये 5G आहे की नाही हे तपासावे लागेल. यासाठी प्रथम सेटिंगमध्ये जा आणि नंतर मोबाइल डेटावर टॅप करा.

त्यानंतर मोबाइल डेटा ऑप्शन्सवर जा आणि व्हॉइस आणि डेटावर टॅप करा. त्यानंतर व्हॉईस आणि डेटावर जावे लागेल आणि 5जी ऑन पर्याय निवडावा लागेल.

iPhone 5G
Gaming Career : गेमिंग आवडतंय ना ? मग तुम्हाला मिळू शकते लाखो रुपये देणारी नोकरी

Airplane Mode 5G चालवण्यास मदत करेल ?

5G इनेबल केल्यानंतरही ते अद्याप चालू केले नसल्यास, तुम्हाला एकदा विमान मोड चालू करावा लागेल. ते चालू करा आणि बंद करा. असे केल्याने काहीवेळा नेटवर्कशी संबंधित किरकोळ समस्यांचे निराकरण होते.

आयफोन जुन्या iOS वर चालतो ?

तुम्हाला अजूनही 5G सेवेचा लाभ मिळाला नसेल, तर तुम्हाला तुमच्या फोनमध्ये नवीन iOS अपडेट इन्स्टॉल करावे लागेल. यासाठी तुम्हाला जनरलमध्ये जाऊन सेटिंगमध्ये जावे लागेल आणि नंतर सॉफ्टवेअर अपडेटवर टॅप करावे लागेल.

तुम्ही नेटवर्क सेटिंग्ज रीसेट केल्या आहेत ?

कधीकधी नेटवर्क सेटिंग्ज रीसेट करणे आवश्यक असते. यामुळे तुमची 5G न चालण्याची समस्याही दूर होऊ शकते.

यासाठी तुम्हाला जनरलमध्ये जाऊन Transfer or Reset iPhoneवर टॅप करावे लागेल. येथे तुम्हाला  Reset Network Settingsवर टॅप करावे लागेल. यानंतर तुमच्या फोनमध्ये 5G चालू होण्याची शक्यता आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com