Phone Hacking : फोन हॅक होऊ नये म्हणून काय कराल ?

हॅकिंग झाल्यावर चूक झाल्याची जाणीव होते पण तोपर्यंत वेळ निघून गेलेली असते.
Phone hacking
Phone hacking google

मुंबई : आपला मोबाईल नंबर बँक खाते, यूपीआय पेमेंटचे खाते, मोबाईल वॉलेट, आधारकार्ड, पॅनकार्ड, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स, निवडणूक ओळखपत्र अशा अनेक महत्त्वाच्या दस्तऐवजांशी संलग्न आहे. यामुळे प्रत्येकासाठी मोबाईल आणि त्यामधील पर्सनल डेटा सुरक्षित राखणे आवश्यक झाले आहे.

मोबाईलचे महत्त्व वाढत असतानाच तो हॅक करून पर्सनल डेटा चोरण्यासाठी प्रयत्न करण्यात वाढ होत आहे. यामुळे मोबाईल हॅकिंगपासून वाचविण्यासाठी प्रत्येकाने काही उपाय करणे आवश्यक आहे. यातील अनेक उपाय हे सोपे आहेत पण अपुऱ्या माहितीमुळे अथवा निष्काळजीपणामुळे ते केले जात नाहीत.

Phone hacking
Technology Tips : लॅपटॉपचा वेग मंदावलाय ? हा उपाय केल्यास विनाअडथळा होईल काम

हॅकिंग झाल्यावर चूक झाल्याची जाणीव होते पण तोपर्यंत वेळ निघून गेलेली असते. आपल्याबाबतीत असा प्रकार घडू नये आणि मोबाईल हॅक होऊ नये यासाठी चुका टाळा आणि निवडक सोपे उपाय करा. यामुळे मोबाईल सुरक्षित राहील आणि हॅकिंगचा धोका कमी होण्यास मदत होईल.

  • मोबाईलमधून डेटा ट्रान्सफर करण्यासाठी तसेच मोबाईल चार्ज करण्यासाठी यूएसबी केबल वापरत असल्यास फक्त स्वतःची केबल वापरा. इतर कोणाचीही यूएसबी केबल वापरणे टाळा.

  • ई-मेल अथवा मेसेजच्या माध्यमातून आलेल्या कोणत्याही लिंकविषयी खात्री नसल्यास त्या लिंकवर क्लिक करणे टाळा. अज्ञात व्यक्तीकडून आलेल्या लिंकवर क्लिक करणे टाळा.

  • स्वतःविषयी महत्त्वाची माहिती ऑनलाईन शेअर करणे टाळा.

  • WhatsApp सारख्या चॅट अॅप्सवर मीडियाचे ऑटो डाउनलोडिंग बाय डीफॉल्ट बंद करा. डाऊनलोड केलेल्या वेगवेगळ्या प्रकारच्या फाइलमधून आपल्या फोनमधील डेटा डीलीट केला जाऊ शकतो अथवा त्या डेटाचा गैरवापर होऊ शकतो. यामुळे खात्री नसल्यास फाइल डाऊनलोड करणे टाळा. अज्ञात व्यक्तीकडून आलेली फाइल डाऊनलोड करणे टाळा. अनावश्यक असलेल्या आणि डुप्लीकेट झालेल्या फाइल डीलीट करा. यामुळे स्टोरेज कपॅसिटीचा व्यवस्थित वापर होईल आणि डेटा सुरक्षित राहील.

Phone hacking
Tech tips : लॅपटॉपवरील या shortcut keys करतील काम सोपे
  • अत्यावश्यक असलेली अधिकृत अॅप वापरा. इतर अॅप वापरू नका आणि फोनमध्ये आधीपासून असलेली पण आपण वापरत नसलेली अॅप काढून टाका. काही तरी गिफ्ट मिळत आहे अथवा फ्री मिळत आहे म्हणून अज्ञात अॅप डाऊनलोड करणे टाळा. एखादे अॅप वापरून बघायचे असेल तर आधी जुन्या फोनवर डाऊनलोड करून बघा. नंतर वापरातील फोनवर डाऊनलोड करावे की नाही याचा विचार करा.

  • मोबाईलमधील ऑपरेटिंग सिस्टिम अर्थात OS आणि वापरातील अॅप अप टू डेट ठेवा. अधिकृत मार्गानेच OS आणि वापरातील अॅप अपडेट करा. हार्डवेअर, अॅप आणि OS आवश्यकतेनुसार अधिकृत मार्गाने अपडेट करा.

  • मोबाईलचा स्क्रीन लॉक पासवर्ड अथवा पॅटर्न लॉक अधूनमधून बदला आणि तो कोणालाही शेअर करू नका.

  • किमान दर तीन महिन्यांनी तुमचा वायफाय पासवर्ड बदला. पासवर्ड सोपे ठेवू नका त्यात आकडे, स्पेशल कॅरेक्टर तसेच कॅपिटल आणि स्मॉल अक्षरांचे कॉम्बिनेशन ठेवा. यामुळे कोणालाही तुमचा पासवर्ड शोधून हॅकिंग करणे जमणार नाही. 

  • वायफायचे सॉफ्टवेअर अर्थात फर्मवेअर अपडेट ठेवा.

  • पासवर्ड, पिन नंबर, ओटीपी अशी माहिती स्वतःपुरती मर्यादित ठेवा ती कोणालाही सांगू नका.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com