मृत्यूनंतर Gmail चं काय होत बंर?

what wil happen with gmail account after death
what wil happen with gmail account after death

पुणे: जगभरात Googleच्या gmail चे कोट्यवधी खातेधारक आहेत. इंटरनेटच्या जमान्यात प्रत्येकजण ई-मेलचा वापर करू लागला आहे. पण, एखाद्या gmail खातेधारकाचा मृत्यू झाला तर पुढे त्या ई-मेल खात्याचे काय होते, याबद्दल अनेकजण साशंक असतात. पण, गुगलने आता मृत्यूनंतर किंवा जीमेल खाते आपोआप डिलिट होण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

काय करायला हवे....
- सर्वात आधी myaccount.google.com या लिंक वर जा.
- नंतर Data & personalization या ऑप्शनवर क्लिक करा.
- त्यानंतर स्क्रोल डाऊन करून Make a plan for your account या ऑप्शनवर क्लिक करा.
- या खाली असलेल्या Start ऑप्शनवर क्लिक करा.

जीमेल खाते डिलिट करण्यासाठी या ठिकाणी आणखी एक पर्याय दिसेल. ज्याद्वारे खाते किती काळ बंद राहिल्यानंतर कंपनी कडून ते डिलिट होणार हे ठरवता येते. start वर क्लिक केल्यानंतर इनअ‍ॅक्टिव्ह मॅनेजरचे पेज दिसेल. यामध्ये 3 महिने, 6 महिने, 12 महिने, 18 महिने असे 4 पर्याय उपलब्ध आहेत. यातील कोणताही पर्याय निवडता येतो. निवडलेल्या पर्यायानुसार तेवढा काळ खाते बंद राहिल्यास कंपनीकडून ते  डिलिट केले जाते. पण, निवडलेल्या पर्यायाचा कालावधी संपत आल्यावर 1 महिना अगोदर एसएमएस किंवा मेलद्वारे संपर्क साधला जातो. त्यानंतरच पुढील प्रक्रिया सुरू केली जाते.

शिवाय, खातेधारकाला जवळच्या 10 व्यक्तींची नावे समाविष्ट करण्याचाही पर्याय उपलब्ध आहे. ज्यामुळे 10 व्यक्तींना जीमेल अकाउंट डिलिट केल्याचे नोटिफिकेशन मिळेल. यामध्ये ऑटो रिप्लायचा पर्यायही निवडता येतो. ज्यामुळे मेल करणाऱ्या व्यक्तीला आपोआप एक मेसेज जाईल की, हे खाते वापरले जात नाही. यामुळे खातेधारकाच्या मृत्यूनंतरही खाते डिलिट करता येऊ शकते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com