व्हॉट्सऍप अपडेट केले का..?

वृत्तसंस्था
शनिवार, 25 फेब्रुवारी 2017

व्हिडिओ कॉलिंग असेल किंवा ते इमेज पाठवण्याची मर्यादेत वाढ किंवा नवनव्या इमोजी असोत, व्हॉट्सऍप युजर्ससाठी नेहमीच नवीन काहीतरी देण्याचा प्रयत्न करत असते. व्हॉट्सऍपने आता नवीन फिचर लॉन्च केले आहे. त्यामुळे आत तुम्ही ऍप अपडेट केल्यावर कॅमेराच्या जागी एक नवीन फिचर दिसणार आहे. 'व्हॉट्सऍप स्टेटस'. 

एँड्रॉईड आणि विंडोज फोनवर व्हॉट्सऍपचे हे नवीन फिचर अपडेट झाले आहे. या नवीन फिचरमुळे स्टेटस अपडेट करताना आता फोटो, व्हिडिओ आणि जीआयएफ इमेजेसचा देखील वापर करता येणार आहे. 

अपडेट झालेले स्टेटस २४ तासांनंतर हे निघून जाईल. त्यामुळे २४ तासांनंतर तुम्हाला पुन्हा नवे स्टेटस अपडेट करावे लागणार आहे. इन्स्टाग्राम आणि स्नॅपचॅट स्टोरी याच्या जवळ जाणारे हे फिचर आहे. या अपडेटमुळे मात्र आता टेक्सच्या स्वरुपात स्टेटस ठेवता येणार नाही.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: WhatsApp’s new Status feature is now live