'या' स्मार्टफोनमधून व्हॉट्सअॅप होणार गायब; यात तुमचा मोबाईल आहे का?

वृत्तसंस्था
Monday, 30 September 2019

आता काही स्मार्टफोनमधून व्हॉट्सअॅप बंद होणार आहे. त्यामुळे तुमच्या फोनमधून व्हॉट्सअॅप बंद होणार का हे आताच तपासून बघा. 

नवी दिल्ली : आपल्या दैनंदिन आयुष्यातला अविभाज्य घटक बनललेले व्हॉट्अॅप बंद झाले तर काय होईल? असा कधी विचार केलाय का? नाही ना... मग आता असा विचार करायला सुरवात करा. कारण आता काही स्मार्टफोनमधून व्हॉट्सअॅप बंद होणार आहे. त्यामुळे तुमच्या फोनमधून व्हॉट्सअॅप बंद होणार का हे आताच तपासून बघा. 

व्हॉट्सअॅप हे अॅप्लिकेशन आता अॅपलच्या iOS8 या ऑपरेटींग सिस्टीमवर चालणार नाही, अशी माहिती WABetaInfo यांनी ट्विटद्वारे दिली आहे. या फोनमध्ये व्हॉट्सअॅप सुरू असेल व ते अनइन्स्टॉल केले तर ते पुन्हा इन्स्टॉल होणार नाही. कारण जुन्या सिस्टीमवर असलेले iOS8 वर व्हॉट्सअॅप चालत असून याची कॅपेबिलिटी 1 फेब्रुवारी 2020मध्ये संपेल.

2.3.6 व्हर्जनच्या अँड्रॉईड स्मार्टफोन, iOS7 वर चालणाऱ्या स्मार्टफोन युझर्सला 1 फेब्रुवारी 2020 पासून व्हॉट्सअॅप वापरता येणार नाही, अशी माहिती व्हॉट्सअॅपने दिली. जे युझर्स अगदी जुने अँड्रॉईड व्हर्जन्स आणि आयफोन्स वापरत असतील, त्यांच्यावर परिणाम होईल. जास्त युझर्सवर याचा परिणाम होणार नाही. तसेच सर्व युझर्सना व्हॉट्सअॅप बंद होणार असल्याचे नोटिफिकेशन्स दिले जात असल्याने त्याचा फार फटका बसणार नाही, असे व्हॉट्सअॅपने सांगितले.

4.0.3 किंवा त्यापेक्षा जास्त व्हर्जनचे स्मार्टफोन्स तसेच iOS8 पेक्षावरचे व्हर्जन वापरणाऱ्या आयफोन युझर्सला व्हॉट्सअॅपच्या निर्णयाचा तोटा होणार नसल्याचे सांगितले आहे. Windows फोनमध्ये WhatsApp 31 डिसेंबर 2019 नंतर व्हॉट्सअ‍ॅप चालणार नाही.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: whatsapp application going to close from some smartphones