

WhatsApp Call Recording Android, Record WhatsApp Calls Without App, Screen Recorder Trick
esakal
Whatsapp Tricks : आजकाल व्हॉट्सअॅप फक्त मेसेजेससाठी नाही, तर लाखो लोक रोज व्हॉइस आणि व्हिडीओ कॉल्स करतात. ऑफिस मीटिंग, कौटुंबिक गप्पा किंवा अभ्यासाच्या चर्चा सगळेच यावर होतात. पण एक मोठी समस्या आहे की व्हॉट्सअॅपमध्ये स्वतःचे कॉल रेकॉर्डिंगचे बटनच नाही. मेटा कंपनी सांगते, आमचे कॉल्स एंड-टू-एंड एन्क्रिप्टेड आहेत, म्हणून बिल्टइन रेकॉर्डिंग दिल्यास गोपनीयतेला धोका होईल. त्यामुळे अनेकजण थर्डपार्टी अॅप्स वापरतात, पण त्यात हॅकिंगचा आणि डेटा चोरीचा धोका खूप असतो.