esakal | Good News: Whatsapp ग्रुप कॉलमध्ये मिळणार मोठी सवलत
sakal

बोलून बातमी शोधा

Good News: Whatsapp ग्रुप कॉलमध्ये मिळणार मोठी सवलत

व्हाट्सअपच्या लेटेस्ट बीटा वर्जन मध्ये नवीन अपडेट आले आहेत. ज्यामध्ये Joinable Calls चे फिचर दिले आहे. जे ग्रुप काॅलला पुन्हा एकदा जॉईन करण्याचे फिचर देईल.

Good News: Whatsapp ग्रुप कॉलमध्ये मिळणार मोठी सवलत

sakal_logo
By
अर्चना बनगे

व्हाट्सअप वर सतत नव- नवीन अपडेट्स येत आहेत. ज्यामुळे युजर्सला नव-नवीन फीचर्स मिळत आहेत . याबरोबरच फेसबुकशी कनेक्ट असणाऱ्या कंपनीने बीटा व्हर्जन फीचर सुरू केले आहे. ज्याच्या मदतीने युजर्सला चालू ग्रुपकॉल मधून जर आपला कॉल कट झाला तर पुन्हा एकदा आपण याच्या मदतीने जॉईन होऊ शकतो.

कंपनीने हे फीचर्स फक्त लेटेस्ट बीटा व्हर्जनसाठी सुरू केले आहे. याला आईओएस प्लॅटफॉर्मवर सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे अँड्रॉइड युजर्सना थोडी वाट पाहावी लागेल. व्हाट्सअप व्हिडिओ कॉलिंग मध्ये अॅड होण्यासाठी आपल्याला परमिशन घ्यावी लागते. मात्र या फिचर मुळे डायरेक्ट जॉईन करता येते.

हेही वाचा- iPhone वर व्हॉट्सअॅप कॉलिंग सेवा बदलणार; यूजर्स ला मिळणार नविन इंटरफेस

WABetalnfo चा रिपोर्ट नुसार व्हाट्सअप ने IOS बीटा अपडेट केला आहे. यामध्ये अपडेट युजर्सना नवीन युजर इंटरफेस मिळेल. हे joinable Calls सोबतच आपल्याला मिळेल. नवीन यूजर इंटरफेस ला ग्रुप कॉलिंग सोबत ही जोडले गेले आहे. या फिचरचा उपयोग करण्यासाठी युजरला Top to Join बॅनर वर क्लिक करावे लागेल.

कसे उपयोगी पडले फीचर

तुम्ही अगदीच खूप महत्त्वाच्या कामात असाल आणि अशा वेळेस ग्रुप कॉल चालू असेल पण तुम्ही त्यावेळी जॉईन होऊ शकत नसाल. मात्र, तुम्ही फ्री झाल्यानंतर तुम्हाला जॉईन व्हायचं असेल तर यासाठी तुम्हाला या फिचरचा फायदा होईल. व्हाट्सअप सेटिंग मध्ये खुप सारे फीचर आहेत. ज्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल. व्हाट्सअप सेटिंग मध्ये जाऊन युजर्स आपल्या प्रोफाईल पिक्चरला हाईड करू शकतो. किंवा जेव्हा तुम्हाला गरज पडेल तेव्हा तुम्ही ब्लॉक कॉन्टॅक्ट ची पूर्ण लिस्ट पाहू शकता.

loading image