
WhatsApp New Feature : व्हॉट्सअॅपने आपल्या युजर्ससाठी नवे Chat Themes फीचर सादर केले आहे, ज्यामुळे चॅटिंगचा अनुभव अधिक आकर्षक आणि खास बनणार आहे. आता तुम्ही चॅट बबल्स आणि वॉलपेपर्स तुम्हाला हवे तअसे बनवून तुमच्या संवादाला एक अनोखा लुक देऊ शकता.
व्हॉट्सअॅपने अधिकृतपणे X (पूर्वीचे Twitter) वर ही घोषणा केली. या अपडेटमुळे युजर्सना त्यांच्या चॅटचा लूक आपल्या पसंतीनुसार बदलण्याचा पर्याय मिळतो. विशेष म्हणजे, तुम्ही प्रत्येक चॅटसाठी वेगळी थीम सेट करू शकता किंवा सर्व चॅटसाठी एकसमान थीम निवडू शकता.
व्हॉट्सअॅपमध्ये वेगवेगळ्या रंगसंगतींच्या प्रीसेट थीम्स दिल्या आहेत, ज्या बॅकग्राउंड आणि चॅट बबल्स ऑटोमॅटिकपणे जुळवतात. तसेच, युजर्सना स्वतःची खास थीम तयार करण्याचीही सुविधा मिळणार आहे. 30 नवीन वॉलपेपर्स दिले गेले असून, युजर्स त्यांच्या गॅलरीमधूनही वॉलपेपर अपलोड करू शकतात.
1. Settings > Chats वर जा.
2. Default Chat Theme पर्याय निवडा.
3. आपल्याला हवी असलेली थीम निवडा.
iOS युजर्स: चॅट उघडून स्क्रीनच्या वरच्या बाजूला असलेल्या नावावर टॅप करा.
Android युजर्स: चॅटमध्ये जाऊन तीन-डॉट मेनू उघडा आणि Chat Theme पर्याय निवडा.
हे फीचर WhatsApp ग्रुप आणि ब्रॉडकास्ट चॅनल्ससाठीही उपलब्ध आहे. विशेष म्हणजे, हे थीम्स फक्त युजरलाच दिसतील, समोरच्या व्यक्तीच्या चॅटवर त्याचा परिणाम होणार नाही.
WhatsApp चॅटिंगला वैयक्तिक टच देणारे हे फीचर युजर्सना नक्कीच आकर्षित करेल. आता तुमच्या मूडनुसार चॅट रंगवा आणि तुमच्या WhatsApp वापरण्याच्या अनुभवाला एक नवीन ओळख द्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.