WhatsApp झाले १२ वर्षांचे, प्रत्येक दिवशी होतात एक अब्जापेक्षा जास्त काॅल

टीम ई सकाळ
Thursday, 4 March 2021

2009 च्या पूर्वी याहूचे कर्मचारी  ब्रायन अॅक्टन आणि जेन काॅम यांनी सुरु केलेल्या व्हाॅट्सअॅपला फेब्रुवारी २०१४ मध्ये फेसबुकने अधिग्रहित केले होते.

व्हाॅट्सअॅपने नुकतीच घोषणा करुन सांगितले, की इन्स्टंन्ट मॅसेजिंग प्लॅटफाॅर्मने १२ वर्षे पूर्ण केली आहेत. आपल्या १२ व्या वर्धापनानिमित्त फेसबुकची मालिकी असलेल्या कंपनीने खुलासा केला की ते प्रत्येक दिवशी एक अब्जपेक्षा अधिक काॅल सांभाळतात. व्हाॅट्सअॅपची सुरुवात फेब्रवारी २००९ मध्ये झाली होती. तिचा मूळ उद्देश युजर्समध्ये स्टेट्स करण्यासाठी डिझाईन केले होते. मात्र काळाबरोबर ते आणखी विकसित होत गेले आणि पूर्ण मॅसेजिंग प्लॅटफाॅर्म बनले. शेवटी कंपनीने यात व्हाॅईस आणि व्हिडिओ काॅलिंग फिचरची भर घातली. कंपनी येथेच थांबली नाही. तिने युजर्सला पेमेंट सर्व्हिससाठी व्हाॅट्सअॅप पेमेंटही सुरु केले.

नव्या वर्षाच्या सुरवातीलाच कंपनीवर नवीन प्रायव्हसी पाॅलिसीवरुन टीका ही होत आहे.नुकत्याच टि्वट केलेल्या पोस्ट द्वारे व्हाॅट्सअॅपने १२ वर्ष पूर्ण झाल्याचे जाहीर केले आहे. यात महिन्याला दोन अब्जांपेक्षा अधिक अॅक्टिव्ह युजर्स आणि १० अब्ज मॅसेजविषयी माहिती दिली आहे. तसेच व्हाॅट्सअॅप दररोज एक अब्जापेक्षा जास्त काॅलही सांभाळते.

व्हाॅट्सअॅपने फेब्रुवारी २०१५ मध्ये आपल्या अॅपमध्ये व्हाईस काॅलिंग सपोर्ट जोडले आणि नोव्हेंबर २०१६ मध्ये व्हिडिओ काॅलिंगची सुविधा देण्यास सुरुवात केली. कंपनीने आॅगस्ट २०१८ मध्ये ग्रुप व्हाईस  आणि व्हिडिओ काॅलिंग सपोर्टही जोडले. काॅलिंग व्यतिरिक्त  व्हाॅट्सअॅप युजर्सला स्टिकर आणि जीआयएफ वापरायचा पर्यायही देत आहे. अॅपमध्ये लेटेस्ट फिचर व्हाॅट्सअॅप पेमेंटचा पर्याय देण्यात आला आहे. त्यामुळे युजर्स पैशांचा व्यवहार करु शकतात. व्हाॅट्सअॅपवर युजर्सची प्रायव्हसीवरुन मोठा वाद होत आहे. याबाबत कंपनीने नवीन प्रायव्हसी पाॅलिस लागू करण्याची घोषणा केली होती. यावर कंपनीने खुलासाही केला, की नवीन पाॅलिसी केवळ बिझनेस अकाऊंटसाठी असेल. त्याचा सामान्य युजर्सवर परिणाम होणार नाही. ही पाॅलिसी फेब्रुवारी महिन्यात लागू करण्याऐवजी ती १५ मेपर्यंत स्थगित केली आहे.  

 

संपादन - गणेश पिटेकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: WhatsApp Complete Its Twelve Years Technology News In Marathi