Whats App 2022 मध्ये घेऊन येणार खास फिचर्स,बदलणार चॅटिंगचा अंदाज

2022च्या सुरूवातीस इंस्टट मेसेजिंग फ्लॅटफॉर्म व्हॉट्सअ‍ॅप (Whats App) आपल्या यूजर्ससाठी खास फिचर्स घेऊन येणार आहे.
Whats App 2022 मध्ये घेऊन येणार खास फिचर्स,बदलणार चॅटिंगचा अंदाज

2022च्या सुरूवातीस इंस्टट मेसेजिंग फ्लॅटफॉर्म व्हॉट्सअ‍ॅप (Whats App) आपल्या यूजर्ससाठी खास फिचर्स घेऊन येणार आहे. यामध्ये अ‍ॅटो डिअपीयरिंग मेसेज (Dispersing Message)आणि मल्टी डिव्हाईस सपोर्ट (multi-device support) फिचर्स देखील समाविष्ट करणार आहे. आता कंपनी आपल्या काही नवीन फिचर्सवर काम करत आहे, जे नवीन वर्षामध्ये लॉंच होतील. आम्ही तुम्हाला व्हॉटस्अ‍ॅपच्या 2022 मध्ये येणाऱ्या खास फिचर्सबाबत (Whats App Features 2022) सविस्तर माहिती देणार आहोत. (Whats App features and changes in 2022)

थीम्स सपोर्ट मिळणार (Themes support)

व्हॉटसअ‍ॅपवर तुम्हाला आणखी चांगला चॅटिंगचा अनुभव मिळावा यासाठी पुढील वर्षी कंपनी प्लॅटफॉर्मवर कस्टम वॉलपेपर आणि चॅट थीम सुरु करणार आहे. पण कंपनीतर्फे वॉल पेपर आणि थीम्स संबधित अधिक माहिती जाहीर झालेली नाही. तज्ज्ञांच्या मते, कंपनीने हे पाऊल मोबाईल अ‍ॅप खूप आकर्षक आणि इंटरअॅक्टिव्ह बनविण्यासाठी उचलणार आहे.

मल्टि लिंक्ड डिव्हाईस (Support for more linked devices)

व्हॉट्सअ‍ॅपचे मल्टी लिंक्ड-डिव्हाइस फिचरमुळे तुम्हाला तुमचे व्हॉट्सअॅप अकाऊंट तुमच्या स्मार्टफोनशिवाय आणखी चार डिव्हाइसशी कनेक्ट करता येते. आजच्या मल्टी-स्क्रीन युगात जेथे बरेच लोक एकापेक्षा जास्त डिव्हाईस वापरतात आणि त्या डिव्हाईसमध्ये काही ना काही कामासाठी एकापेक्षा अधिक ब्राउझर वापरतात. व्हॉट्सअ‍ॅपचे मल्टी लिंक्ड-डिव्हाइस फिचर्ससाठी चार डिव्हाईसची मर्यादा ठेवण्यात आली आहे.

अ‍ॅटो डिलीट अकाऊंट (Auto Delete Account)

टेलीग्राम आपल्या यूजर्सला स्वत: अकाऊंट डिलीट करण्याची सुविधा देत आहे. अंकाऊट डिलिट करण्यासाठी यूजर्स आपल्या हिशोबाने टाईम सेट करू शकतात. अशा प्रकारे या व्हॉटसअ‍ॅप आपल्या यूजर्सला अॅटो डिलीट अंकाऊट फिचरचा सपोर्ट देण्याची तयारी करत आहे, जी 2022मध्ये जाहीर होण्याची शक्यता आहे. पण, व्हॉट्स अ‍ॅपने आतापर्यंत हे फिचर लॉन्चिंगबाबत अद्याप कोणतेही संकेत दिलेले नाही.

व्हॉट्सअ‍ॅप डिलीट मेसेज

व्हॉटसअ‍ॅपवर यूजर्सला पाठवलेला मेसेज डिलीट करण्यासाठी ६८ मिनिटांचा वेळ मिळतो पण आता कंपनी हा वेळ काढून टाकण्याची तयारी करत आहे. म्हणजे यूजर्स कधीही पाठवेलेला मेसेज डिलीट करू शकतात. या फिचर्सचे टेस्टिंग चालू आहे. डिलीट मेसेजला नवीन वर्षात अपडेट केले जाईल अशी आशा व्यक्त केला जात आहे.

व्हॉट्सअ‍ॅपमध्ये मिळू शकते इंन्टग्राम् रीलचा टॅब

आता समोर आलेल्या मिडिया रिपोर्टसनुसार, व्हॉटस्अ‍ॅप यूजर्सला प्लॅटफार्मवर इंस्टाग्रामवर रीलचा टॅब मिळू शकतो, त्याच्या मदतीने यूजर्स मेसेजिंग अ‍ॅपमध्येचे इंस्टग्रामरील पाहू शकतात. पण कंपनीतर्फे या इंटग्रिशेनबाबत कोणतीही अधिकृत माहिती जाहीर केली आहे.

पुन्हा पुन्हा नोटीफिकेशन देणे (Repeat notifications)

जेव्हा तुमचा फोन दूर असतो तेव्हा तुम्हाला एकाधिक अ‍ॅपवरून खूप सारे नोटिफिकेशन प्राप्त होतात, तेव्हा तुम्ही नोटिफिकेशन पॅनेलमधील काही नोटिफिकेशन चुकवू शकता. यामध्ये महत्त्वाचे संदेश समाविष्ट असू शकतात जे तुम्हाला कदाचित कळत नाहीत की ते प्राप्त झाले आहेत. रिपीट नोटिफिकेशन्स वापरकर्त्यांना आधीच प्राप्त झालेल्या त्याच मेसेजसाठी ठरविलेल्या वेळी पुन्हा अलर्ट करण्याची परवानगी देतात जेणेकरून तुम्ही महत्त्वाचे संदेश चुकवणार नाही.

मेसेज टायपिंग बॉक्समधील WhatsApp Pay आयकॉन काढून टाका (Remove WhatsApp Pay icon in the message typing box)

व्हॉट्सअ‍ॅप पे, एक UPI-आधारित पेमेंट प्लॅटफॉर्म आहे जो Google Pay किंवा Paytmचा एक सोपा पर्याय असू शकतो, ज्यांना UPI पेमेंटमध्ये सहभागी व्हायचे आहे त्यांच्यासाठी एक उत्तम फिचर असू शकते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com