Whatsapp Hacking Safety : कधीच हॅक होणार नाही तुमचं व्हॉट्सअ‍ॅप! पोलिसांनी सांगितली भन्नाट ट्रिक, पाहा एका क्लिकवर

Whatsapp Hacking Safety guidelines : व्हॉट्सअ‍ॅप हॅकिंगच्या वाढत्या घटनांमुळे पोलिसांनी नागरिकांसाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. याने तुमच्या व्हॉट्सअ‍ॅपची सुरक्षितता वाढेल. जाणून घ्या सविस्तर..
Whatsapp Hacking Safety guidelines
Whatsapp Hacking Safety guidelinesesakal
Updated on

Whatsapp Security guidelines : गेल्या काही दिवसांत व्हॉट्सअ‍ॅप हॅकिंगच्या घटना झपाट्याने वाढत असून सायबर गुन्हेगार या लोकप्रिय मेसेजिंग अ‍ॅपचा गैरफायदा घेत आहेत. या पार्श्वभूमीवर हरियाणा पोलिसांनी नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाच्या सूचना जारी केल्या आहेत. हरियाणा पोलिसांनी एक सोपी आणि पद्धतशीर प्रक्रिया जाहीर केली आहे जी वापरकर्त्यांना हॅक झालेलं व्हॉट्सअ‍ॅप अकाउंट परत मिळवण्यास मदत करू शकते.

व्हॉट्सअ‍ॅप हॅक झाल्यास काय करावे?

  1. व्हॉट्सअ‍ॅप लगेच अनइन्स्टॉल करा – हॅकरचा थेट अ‍ॅक्सेस रोखण्यासाठी हे पाऊल आवश्यक आहे.

  2. सिम कार्ड मोबाईलमधून काढा आणि हे सिम एका साध्या कीपॅड फोनमध्ये टाका.

  3. वाई-फायवरून पुन्हा अ‍ॅप इन्स्टॉल करा – तुमच्या Android फोनमध्ये वाय-फाय वापरून व्हॉट्सअ‍ॅप पुन्हा इन्स्टॉल करा.

  4. Call Me पर्याय निवडा – SIM नसलेल्या फोनवर व्हेरिफिकेशनसाठी “Call Me” पर्याय वापरा.

  5. कोड मिळवून ते Android फोनमध्ये टाका – कोड मिळाल्यानंतर ते तंतोतंत Android फोनमध्ये टाका.

  6. फोन रीस्टार्ट करा – आणि आता तुमचं व्हॉट्सअ‍ॅप परत सुरू होईल.

Whatsapp Hacking Safety guidelines
AC Tips : घरात AC वापरताय, पण विजबिल वाचवायचं आहे? साफसफाई करताना फॉलो करा 'ही' एक भन्नाट ट्रिक

हॅकिंगपासून वाचण्यासाठी खबरदारीची पावलं

  • OTP कोणालाही देऊ नका – कोणतीही खात्रीशीर वाटणारी व्यक्ती असली तरीही नाही.

  • अनोळखी लिंकवर क्लिक करू नका – यामुळे फिशिंगचा धोका संभवतो.

  • पब्लिक Wi-Fi वापरणं टाळा – सार्वजनिक नेटवर्कवरून हॅकिंगची शक्यता अधिक असते.

  • अ‍ॅप वेळोवेळी अपडेट करा – सिक्युरिटीसाठी आवश्यक असलेले अपडेट्स नियमितपणे इंस्टॉल करा.

  • Two-Step Verification सुरू करा – हे अतिरिक्त संरक्षण तुमच्या अकाउंटला सुरक्षित ठेवेल.

Whatsapp Hacking Safety guidelines
Uranus Day Length : यूरेनस ग्रहावर एका दिवसाची लांबी किती? संशोधनातून समोर आली आश्चर्यकारक माहिती

हरियाणा पोलिसांच्या या मार्गदर्शक सूचना फक्त हरियाणातीलच नव्हे, तर देशभरातील व्हॉट्सअ‍ॅप वापरकर्त्यांसाठी उपयुक्त ठरणार आहे. कारण व्हॉट्सअ‍ॅप आपल्या दैनंदिन जीवनाचा आवश्यक भाग आहे. त्यामुळे त्याची सुरक्षा महत्वाची आहे. सायबर हल्ल्यांपासून स्वतःचं संरक्षण करण्यासाठी सजग राहणं ही काळाची गरज आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com