
लंडन, ता. १७ (वृत्तसंस्था) : ब्रिटनमधील पोलिसांनी व्हॉट्सॲप हॅक होण्याच्या घटनांबाबत सावधगिरीचा इशारा नुकताच जारी केला आहे. विद्यार्थी, आरोग्य सेवक, धार्मिक आणि वांशिक गट आणि व्यापारी यांना प्रामुख्याने लक्ष्य केले जात असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.
व्हॉट्सॲप हॅक होण्याचे प्रकार पूर्वीही घडले असले तरी आता त्यांचे प्रमाण वाढले असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.