
WhatsApp Message Reminders : व्हॉट्सअॅपने आपल्या युजर्ससाठी एक नवी आणि महत्त्वाची सुविधा आणली आहे. जर तुम्ही वारंवार मेसेज वाचायचे विसरत असाल, तर तुमच्यासाठी ही समस्या आता संपणार आहे. WhatsApp लवकरच युजर्सना वाचल्या न गेलेल्या मेसेजची आठवण करून देणार आहे.
जगभरात सुमारे ४ अब्ज लोकांनी वापरणाऱ्या व्हॉट्सअॅपच्या लोकप्रियतेत दिवसेंदिवस भर पडत आहे. युजर्सचा अनुभव अधिक चांगला करण्यासाठी WhatsApp सतत नवनवीन फीचर्स आणत असते. २०२४ मध्ये, व्हॉट्सअॅपने काही भन्नाट फीचर्स आणले आहेत, त्यापैकी ‘Message Reminders’ हे खास फीचर चर्चेत आहे.
‘Message Reminders’ हे फीचर युजर्सला वाचल्या न गेलेल्या संदेशांची आठवण करून देते. याआधी व्हॉट्सअॅप स्टेट्स अपडेट्ससाठी अशा प्रकारच्या नोटिफिकेशन्स देण्यात येत होत्या. मात्र, आता हे फीचर चॅटमध्येही वाचल्या न गेलेल्या संदेशांसाठी उपलब्ध होणार आहे.
सध्या हे फीचर बीटा व्हर्जनमध्ये काही निवडक युजर्ससाठी उपलब्ध आहे. या फीचरची चाचणी पूर्ण झाल्यानंतर ते सर्व युजर्ससाठी लवकरच सादर होईल. WABetainfo च्या अहवालानुसार, व्हॉट्सअॅपच्या अँड्रॉइड बीटा व्हर्जनमध्ये हे फीचर पाहायला मिळत आहे.
युजर्सना हे फीचर वापरण्यासाठी सेटिंग्जमध्ये एक नवीन टॉगल दिला गेला आहे. हा टॉगल सुरू केल्यानंतर तुम्हाला वाचल्या न गेलेल्या संदेशांसाठी आणि स्टेट्ससाठी अलर्ट मिळेल. यामुळे महत्त्वाचे चॅट्स विसरण्याचा धोका राहणार नाही आणि युजर्स सहजपणे आपल्या दैनंदिन संवादांवर लक्ष ठेऊ शकतील.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.