
whatsapp new feature : व्हॉट्सअॅप वापरणाऱ्यांसाठी एक महत्त्वाची आणि सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून दिलासा देणारी बातमी आहे. मेटा कंपनीच्या मालकीच्या या लोकप्रिय मेसेजिंग अॅपमध्ये लवकरच एक नवे आणि स्मार्ट फीचर येणार आहे, ज्यामुळे युजर्सना कोणत्याही व्यक्तीशी चॅट करताना आपला मोबाईल नंबर शेअर करण्याची गरज भासणार नाही.