डोन्ट वरी, आता WhatsApp मधल्या तुमच्या विशिष्ट खाजगी चॅटला असे लावा लॉक

सकाळ वृत्तसेवा
Friday, 8 January 2021

WhatsApp वरील खाजगी चॅट चुकून देखील कुणीही वाचू नये, अशीच सगळ्यांची इच्छा असते.

नवी दिल्ली : WhatsApp हे चॅटींगसाठी सर्वाधिक वापरले जाणारे ऍप आहे. आपले मित्र मंडळी, कुटुंबातील नातेवाईक, गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड या साऱ्यांसोबतच्या आपल्या गप्पा आणि गुजगोष्टी या WhatsApp वरच  होत असतात. WhatsApp द्वारेच अनेक लोक आपल्या खाजगी गोष्टी एकमेकांना शेअर करत असतात. हे खाजगी चॅट चुकून देखील कुणीही वाचू नये, अशीच सगळ्यांची इच्छा असते. आपल्या गैरहजरीत आपल्या मोबाईलमधील हे खाजगी चॅट कुणी वाचलं तर? ही भीती आपल्याला सतत सतावत असतेच. पण आता ही भीती नाहक ठरणार आहे. कारण आम्ही तुम्हाला आता अशी एक क्लृप्ती सांगणार आहोत, ज्यामुळे तुमची ही फुकाची भीती नष्ट होऊन जाणार आहे. या क्लृप्तीद्वारे तुम्ही कायमचे सुरक्षित होऊन जाल. तुमच्या WhatsAppवरील एखाद्या विशिष्ट चॅटला आता लॉक लावता येणार आहे. 

यासाठी काय करावं लागेल?
यासाठी WhatsApp Chat Locker या नावाचे ऍप तुम्हाला गुगल प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करावे लागेल. या अ‍ॅपमध्ये पासवर्ड टाकून तुम्ही कोणत्याही एका किंवा अधिक लोकांच्या चॅट्सना लॉक करू शकता. हे अ‍ॅप कसे काम करतं ते जाणून घ्या...

एकाच WhatsApp चॅटला लॉक कसे करावे

  • आधी Google Play Store वरून WhatsApp चॅट लॉकर हे ऍप डाउनलोड करा.
  • ऍपमध्ये आपल्याला पासवर्ड सेट करण्याचा पर्याय मिळेल. आता आपला आवडता पासवर्ड सेट करा.
  • आता दुसऱ्या पेजच्या तळाशी आपल्याला + चे चिन्ह दिसेल, त्यावर क्लिक करा.
  • आता नवीन पेजवरील Lock Whatsapp Chats वर टॅप करा.
  • आपल्याला पासवर्ड प्रोटेक्शनचा संदेश मिळेल. त्यामध्ये ओके क्लिक करा. आता फोन सेटिंग्जच्या Accessibility पर्यायावर क्लिक करा.
  • पुन्हा ऍपवर जा आणि + आयकॉनवर क्लिक करा आणि Lock Whatsapp Chats टॅप करा. आता आपल्याला एक नवीन संदेश मिळेल. त्याला OK करा. तुम्ही OK करताच तुमचा WhatsApp उघडेल.
  • आता आपण ज्या संपर्कास आपल्या व्हाट्सएपमध्ये लॉक करू इच्छित आहात त्या संपर्कावर टॅप करा. आपणास Conversation लॉकचा संदेश मिळेल. आता आपल्या चॅट्सना लॉक केले आहे, जे दुसरे कोणीही उघडू शकणार नाहीये.
  • या चॅट्सना आता अनलॉक करण्यासाठी, ऍपवर जाऊन पासवर्ड टाकणे आवश्यक आहे. आपण लॉक केलेल्या चॅटचे नाव दिसेल. आपण त्यावर टॅप करताच आपल्याला एक अनलॉक संदेश मिळेल. त्यावर OK करा.
  • आता OK वर टॅप केल्यास चॅट्स अनलॉक होतील. आता कोणीही ते पाहू शकते.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: WhatsApp know how to lock your particular private chat on WhatsApp