Whatsapp New Feature : व्हॉट्सअ‍ॅपमध्ये 2 जबरदस्त फीचर्सची एंट्री! कसं वापरायचं? पाहा एका क्लिकमध्ये

Whatsapp Latest Features : व्हॉट्सअ‍ॅपमध्ये स्टेटस मेंशन करण्यासाठीच एक फीचर आणले होते. त्यानंतर आता व्हॉट्सअ‍ॅपने आणखी एक नवे फीचर आणले आहे.
Whatsapp New Features
Whatsapp Status Group Mention Featureesakal
Updated on

Whatsapp Status Group Mention : व्हॉट्सअ‍ॅप हे आता फक्त चॅटिंगसाठी मर्यादित राहिलेला नाही. आपल्या रोजच्या आयुष्यातील अनेक कामांसाठी महत्वाचे झाला आहे. जगभरातील सुमारे 3.5 अब्ज वापरकर्त्यांसाठी WhatsApp सतत नवे फीचर्स आणत असतो. याच पार्श्वभूमीवर iOS आणि Android वापरकर्त्यांसाठी दोन नव्या वैशिष्ट्यांची चाचणी सुरू झाली आहे.

स्टेटस अपडेटमध्ये ‘ग्रुप मेंशन’चे नवे फिचर

WhatsApp लवकरच वापरकर्त्यांना त्यांच्या स्टेटस अपडेटमध्ये ग्रुपला थेट मेंशन करण्याचा पर्याय देणार आहे. यामुळे प्रत्येक सदस्याला वेगळे टॅग करण्याची गरज संपेल. ही सुविधा खासकरून मोठ्या ग्रुपसाठी उपयोगी ठरेल, जिथे माहिती पटकन सर्वांपर्यंत पोहोचवायची असते.

Wabetainfo या व्हॉट्सअ‍ॅपच्या अपडेट्सची माहिती देणाऱ्या वेबसाइटनुसार, "Group Chat Mention in Status Update" असे या वैशिष्ट्याचे नाव आहे. सध्या हे फीचर Android च्या Google Play Store वरील बीटा चाचणीसाठी उपलब्ध आहे. जानेवारी 2025 पर्यंत सर्व वापरकर्त्यांसाठी हे फीचर रोलआउट होईल अशी अपेक्षा आहे.

Whatsapp New Features
Oppo Find X8 Series : स्मार्टफोन कंपन्यांना रडवणार Oppo Find X8 सीरिज; आयफोन सारखे जबरदस्त फीचर्स असणारे हे 2 मोबाईल बघाच

iPhone वापरकर्त्यांसाठी इन-अॅप डायलर

iPhone वापरकर्त्यांसाठी व्हॉट्सअ‍ॅप आणखी एक मोठे अपडेट देत आहे. आता iOS यूजर्सना WhatsApp वरून थेट कॉल करण्यासाठी नंबर सेव्ह करण्याची गरज नाही. इन-अॅप डायलरच्या मदतीने नंबर सेव्ह न करता थेट कॉल करता येईल.

याशिवाय व्हॉइस कॉल्ससाठीही WhatsApp ने अनेक सुधारणा केल्या आहेत. आता व्हिडिओ कॉल्स अधिक इंटरॅक्टिव्ह झाले असून, डेस्कटॉपवरून कॉल करणेही सोपे झाले आहे.

Whatsapp New Features
Oneplus 13 Launch : नव्या वर्षाची धमाकेदार सुरुवात; या तारखेला लाँच होतोय Oneplus 13, जबरदस्त फीचर्स अन् किंमत फक्त...

कधी मिळणार हे फीचर्स?

सध्या ही फीचर्स बीटा टेस्टरसाठी उपलब्ध आहेत. लवकरच सर्व वापरकर्त्यांसाठी हे रोलआउट करण्यात येईल. नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच WhatsApp वापरकर्त्यांसाठी हे फीचर्स मोठी भेट ठरणार आहे.

WhatsApp च्या या नव्या अपडेट्समुळे वापरकर्त्यांचा अनुभव अधिक सुलभ होणार असून, त्याचा वापर पूर्वीपेक्षा अधिक सोपा आणि बेस्ट होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com