WhatsApp AI Feature :व्हॉट्सॲपवर बनवा स्वतःचा हवा तसा फोटो; कंपनी लाँच करतीये नवीन फीचर, मेटा एआयला द्या फक्त 'ही' सूचना

Imagine Me Feature : आपल्या सर्वांना आपल्या प्रोफाइल पिक्चर्ससाठी छान फोटो हवे असतातच पण कधी कधी फोटो काढायला वेळ मिळत नाही किंवा मग काढलेला फोटो आवडत नाही.
WhatsApp Imagine Me ai Feature
WhatsApp Imagine Me ai Featureesakal

Whatsapp Update : आपल्या सर्वांना आपल्या प्रोफाइल पिक्चर्ससाठी छान फोटो हवे असतातच पण कधी कधी फोटो काढायला वेळ मिळत नाही किंवा मग काढलेला फोटो आवडत नाही. कधी कधी डिपी लावल्यानंतर तो ब्लर दिसतो. या समस्येवर WhatsApp एक धमाकेदार करणारा पर्याय घेऊन येत आहे.

WhatsApp अॅपच्या बीटा आवृत्तीत एक नवीन 'Imagine Me' नावाचा फीचर चाचणीत आहे. या फीचरच्या सहाय्याने तुम्ही तुमचे AI (Artificial Intelligence) जेनरेटेड फोटो बनवू शकता.

WhatsApp Imagine Me ai Feature
Meta Controversy : मेटाकडून वापरकर्त्यांची फसवणूक! इंस्टाग्राम अन् फेसबुकबद्दलचे नवे मॉडेल फसले; कंपनीला भरावा लागणार दंड?

WABetaInfo च्या अहवालानुसार, हा फीचर Meta AI च्या मदतीने बनवला जात आहे. वापरकर्त्यांना या फीचरचा वापर करण्यासाठी काही फोटो अपलोड करावे लागतील. या फोटोवरून AI तुमचा अवतार तयार करेल. एकदा फोटो अपलोड केल्यानंतर, चॅटबॉटला "Imagine me" असे लिहिल्यावर Meta AI तुमचा AI फोटो तयार करून देईल. इतकेच नाही तर चॅटमध्ये इतरांना @Meta AI imagine me असा मेन्सन केल्यावरही तुम्ही हा फोटो जेनरेट करू शकता.

WhatsApp Imagine Me ai Feature
Email Delete : ईमेल्सचा भडिमार झालाय? आता चिंता नाही, एका क्लिकवर डिलीट करा हवे तेवढे ईमेल,वापरा सोपी ट्रिक

ही एक वैकल्पिक सुविधा असल्यामुळे वापरकर्त्यांना त्यांच्या मर्जीनुसार ती चालू किंवा बंद करता येईल. तुमच्या संभाषणातील मजकूर AI वाचू शकणार नाही पण तयार झालेला फोटो मात्र चॅटमध्ये शेअर केला जाईल. तुमच्या सर्व अपलोड केलेल्या फोटोजवर तुमचा पूर्ण control असेल आणि तुम्ही Meta AI च्या सेटिंग्जमधून त्या कधीही डिलीट करू शकता.

WhatsApp अजूनही या फीचरवर काम करत आहे पण WhatsApp मध्ये येणारे हे नक्कीच एक मनोरंजक फीचर असणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com