व्हॉट्‌सऍपवर आता रिअल टाईम लोकेशन 

Whatsapp real time location
Whatsapp real time location

मुंबई : व्हॉट्‌सऍपवर आपल्या कॉन्टॅक्‍ट लिस्टमधील वापरकर्त्यांचे रिअल टाईम लाईव्ह लोकेशन "ट्रॅक' करण्याची सुविधा नव्या अपडेटमध्ये मिळणार आहे. 
व्हॉट्‌सऍपचे हे नवे बिटा व्हर्जन ऍण्ड्रॉईड आणि आयओएस ऑपरेटिंग सिस्टिमच्या स्मार्टफोनसाठी वापरता येणार आहे. ट्रॅकिंगचा पर्याय एक मिनिटापासून अमर्याद कालावधीसाठी असणार आहे. महत्त्वाचे म्हणजे, ग्रुपमध्येही ही सुविधा वापरता येणार आहे. लाईव्ह स्ट्रिमिंग बंद करण्याचा पर्यायही वापरकर्त्यांकडे असेल. व्हॉट्‌सऍप युजर्सना ही सुविधा ऍक्‍टिव्हेट करावी लागेल. गत वर्षाच्या अखेरीस व्हॉट्‌सऍपने आयओएसच्या युजर्सकरता मेसेज एडिटचा पर्याय दिला होता. तसेच व्हिडिओ कॉलिंगची सुविधाही दिली होती. व्हॉट्‌सऍपचे भारतात 16 कोटी युजर्स आहेत. 10 भारतीय भाषांमध्ये व्हॉट्‌सऍप उपलब्ध आहे. जगभरात 10 कोटी व्हॉट्‌सऍप कॉल केले जातात. 

व्हॉट्‌सऍप स्टेटस्‌ 
व्हॉट्‌सऍप कॉन्टॅक्‍ट लिस्टमधील एखाद्या कॉन्टॅक्‍टने स्टेटस्‌ मेसेज बदलला की त्याचे नोटीफिकेशन वापरकर्त्यांना मिळणार आहे. "पुश नोटीफिकेशन'च्या माध्यमातून ही सुविधा युजर्सना मिळेल. 24 तासांत नोटीफिकेशन डिलिट करण्याचाही पर्याय असेल.  
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com