WhatsApp Feature : व्हॉट्सॲपचं नवं फिचर; एकाच वेळी करू शकता 32 लोकांना व्हिडिओ कॉल

व्हॉट्सॲप कम्युनिटी फिचरची चाचणी खूप दिवसांपासून सुरू होती. कम्युनिटी फिचर व्यतिरिक्त अनेक नवीन फीचर्स देखील जोडण्यात आले आहेत.
whatsapp new update
whatsapp new update sakal

दीर्घ कालावधीच्या चाचणीनंतर व्हॉट्सॲपने अखेर त्यांचे ग्रुप फिचर जारी केले आहे. व्हॉट्सॲप कम्युनिटीज फिचर जागतिक स्तरावर जारी करण्यात आले आहे. ज्यामध्ये भारताचा देखील समावेश आहे. व्हॉट्सॲप कम्युनिटी फिचरची चाचणी खूप दिवसांपासून सुरू होती. कम्युनिटी फिचर व्यतिरिक्त अनेक नवीन फीचर्स देखील जोडण्यात आले आहेत.

व्हॉट्सॲप कम्युनिटीज फिचरद्वारे मतदान केले जाऊ शकते आणि टॅप व्हिडिओ कॉलिंग उपलब्ध असेल. याशिवाय व्हिडिओ कॉलिंगमध्ये 32 लोक एकाच वेळी ग्रुपमध्ये सहभागी होऊ शकतील. मेटाचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांनी कम्युनिटी फीचरची घोषणा केली आहे.

व्हॉट्सॲप कम्युनिटीजचा सर्वात मोठा फायदा हा असेल की तुम्ही सर्व ग्रुप्स एका कम्युनिटीमध्ये ठेवू शकाल. ग्रुप फिचर अंतर्गत ऍडमिन कोणत्याही प्रकारची घोषणा करू शकतो. ग्रुप फिचर कार्यालये, शाळा, क्लब आणि इतर संस्थांना कनेक्ट करण्याचा हेतू आहे.

हेही वाचा: राष्ट्र तरेल कसे? धर्मकारणातून की धर्मनिरपेक्षतेतून?

व्हॉट्सॲपमध्ये ग्रुप पोल फीचर देखील आले आहे. ज्याचा वापर मतदानासाठी केला जाऊ शकतो. याशिवाय, आता एका ग्रुपमध्ये 1,024 लोकांना जोडले जाऊ शकते, जी आधी 512 इतकी होती. टेलिग्रामच्या ग्रुपमध्ये 2,00,000 लोक सामील होऊ शकतात.

आजपासून, WhatsApp चे नवे फिचर 1024 पर्यंत एका गटात जोडू देईल. सध्या, तुम्ही एका गटात 200 पेक्षा जास्त लोकांना जोडू शकत नाही. तुम्ही एका ग्रुप व्हिडिओ कॉलमध्ये 32 लोकांना सहभागी करून घेऊ शकता. त्याशिवाय, व्हॉट्सॲपने मोठ्या प्रमाणात फाइल शेअरिंग, इमोजी प्रतिक्रिया आणि ॲडमिन डिलीट फिचर्स देखील आणले आहेत.

whatsapp new update
Instagram : इन्स्टाग्रामवर येणार नवं फिचर; पैसे मिळवण्यास होणार मदत

व्हॉट्सॲप (WhatsApp) तुम्हाला इन-चॅट पोलवर एक प्रश्न तयार करू देईल आणि अॅपमध्ये एका वेगळ्या स्क्रीनवर 12 पर्यंत संभाव्य उत्तरांचे पर्याय देईल. व्हॉट्सॲपने हे फीचर कसे दिसेल आणि त्याची कार्यक्षमता अद्याप उघड केलेली नाही. नवीन फीचर्स मिळविण्यासाठी तुम्हाला प्ले स्टोअर किंवा ॲप स्टोअरमधून तुमचे व्हॉट्सअॅप अपडेट करावे लागेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com