WhatsApp चे नवीन धमाकेदार फीचर! आता 10 मिनिटांपासून 14 दिवसांपर्यंत आधीच शेड्यूल करा मेसेज, फोटो अन् व्हिडिओ...

WhatsApp Major Update: अँड्रॉइड बीटा युझर्ससाठी व्हॉट्सॲपने रोलआऊट केले मेसेज शेड्यूलिंग फीचर; ठरलेल्या वेळी मेसेज पाठवण्यासाठी आता ऑनलाईन राहण्याचीही गरज नाही!
WhatsApp Update

WhatsApp Update on Schedule Messages, Photos & Videos

esakal 

Updated on: 

WhatsApp New Feature: जगातील सर्वात लोकप्रिय मेसेजिंग ॲप व्हॉट्सॲपने (WhatsApp) आपल्या कोट्यवधी युझर्ससाठी एक अत्यंत उपयुक्त आणि बहुप्रतिक्षित फीचर आणण्याची तयारी पूर्ण केली आहे. आता व्हॉट्सॲपवर कोणत्याही व्यक्तीला किंवा ग्रुपवर ठरलेल्या वेळेत मेसेज पाठवण्यासाठी युझर्सना प्रत्यक्ष ऑनलाईन राहण्याची गरज पडणार नाही. कंपनी अँड्रॉइड युझर्ससाठी मेसेज शेड्यूलिंग (Message Scheduling) हे नवीन फीचर टेस्ट करत आहे.

याच्या मदतीने युझर्स टेक्स्ट मेसेजसह लिंक्स, फोटो आणि व्हिडिओ आधीच शेड्यूल करून ठेवू शकतील आणि ठरलेल्या वेळी ते आपोआप सेंड होतील. WABetaInfo च्या ताज्या रिपोर्टनुसार, हे फीचर सध्या WhatsApp Android Beta व्हर्जन 2.26.40.7 वापरणाऱ्या काही युझर्ससाठी उपलब्ध करून देण्यात आले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com