Whatsapp : केंद्र सरकारच्या इशाऱ्यानंतर 'व्हॉट्सअप'चं आश्वासन; आंतरराष्ट्रीय स्पॅम कॉल्स 50 टक्के कमी करणार

Whatsapp News
Whatsapp Newsesakal

नवी दिल्लीः व्हॉट्सअॅपवर येणाऱ्या आंतरराष्ट्रीय कॉल्समुळे भारतातील वापरकर्ते त्रस्त झाले आहेत. इंडोनेशिया, व्हिएतनाम, मलेशिया या देशांमधून भारतीय युजर्सना कॉल्स येत आहेत. त्यामुळे केंद्र सरकारने व्हॉट्सअॅपविरोधात पावलं उचण्याचा तयारी दर्शवली होती.

व्हॉट्अॅप ही मेटाच्या मालकीची कंपनी आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवरुन भारतातील युजर्सना फसवणुकीचे कॉल्स मोठ्या प्रमाणावर येत आहेत. त्यामुळे केंद्र सरकारने व्हॉट्सअॅपला नोटीस पाठण्याची घोषणा केली होती.

Whatsapp News
Shivsena : घड्याळाचे काटे मागे फिरणार नाही, आता उद्धव ठाकरे...; राजकीय तज्ञांचे मत

यासंदर्भात व्हॉट्सअॅपने सांगितलं की, असे प्रकार कमी करण्यासाठी एआय आणि एमएल प्रणाली म्हणजेच कृत्रिम बुद्धीमत्ता आणि मशीन लर्निंग पद्धती विकसित करण्यात आली आहे. एका अहवालानुसार भारतामध्ये ४८७ दशलक्ष व्हॉट्अॅप युजर्स आहेत.

व्हॉट्सअॅपने निवेदनात पुढे सांगितले की, नवीन विकसित केलेल्या प्रणालीमुळे सध्या येणारे आंतरराष्ट्रीय कॉल्स ५० टक्क्यांनी कमी होणार आहेत. तरीही आम्ही आणखी सुधारणा करुन वापरकर्त्यांच्या सुरक्षेची काळजी घेऊ, असं निवेदनामध्ये सांगण्यात आलेलं आहे.

Whatsapp News
Yuzvendra Chahal KKR vs RR : युझी चहलनं चेन्नईच्या ब्राव्होला टाकलं मागं, आयपीएलमध्ये इतिहास रचला

यापूर्वी आयटी राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी यासंदर्भात भाष्य केलं होतं. आंतरराष्ट्रीय नंबरवरुन स्पॅम कॉल्स वाढत असल्याने भारतीय युजर्स त्रस्त झाले आहेत. त्यामुळे व्हॉट्सअॅपला नोटीस पाठवण्यात येईल, असं म्हटलं होतं.

मागील काही दिवसांमध्ये आंतरराष्ट्रीय कॉल्स वाढले आहेत. त्यामुळे आर्थिक नुकसान होण्याचा मोठ्या प्रमाणावर धोका आहे. हे कॉल्स इंडोनेशइया, व्हिएतनाम, मलेशइया आदी देशांमधून येत आहेत. हे कॉल्स +251, +62, +254, +84 अशा क्रमांकावरुन येतात. व्हॉट्सअॅपने याबाबत अशा कॉल करणाऱ्यांवर प्रतिबंध करत असल्याचं म्हटलं आहे. शिवाय युजर्सना ब्लॉक आणि रिपोर्ट, असे पर्याय उपलब्ध असल्याचं निवेदनात स्पष्ट केलं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com