लवकरच येणार व्हॉट्सऍपचे दोन नवीन फिचर 

Whatsapp
Whatsapp

नवी दिल्ली - बऱ्याचदा व्हॉट्सऍपवर आपण मेसेजेस आले की ते सरळ दुसऱ्या ग्रुपवर फॉरवर्ड करतो. त्याची सतत्या काय आहे? त्या मेसेजमध्ये काय संदेश आहे हे तपासले जात नाही. यामुळे अनेकदा चूकीचा मेसेज मोठ्या प्रमाणावर शेअर होतो. यासाठी आता व्हॉट्सऍपवर लवकरच नवीन फिचर येणार आहे. यात युजर्सना व्हॉट्सऍपवर मेसेज किती वेळा फॉरवर्ड झालाय हे कळणार असून, वारंवार एकसारख्याच आशयाच्या मेसेजेसवर निर्बंध येणार आहेत. WABetaInfo ने या निर्णयाची घोषणा केली आहे. 

'Forwarding Info' आणि 'Frequently Forwarded' हे फिचर्स लवकरच व्हॉट्सऍपवर लागू करणार असल्याचे कंपनीने सांगितले. 'फॉरवर्डिंग इन्फो' हे ऑप्शन मेसेज इन्फो सेक्शनमध्ये उपलब्ध होणार असून, याद्वारे मेसेज किती लोकांना फॉरवर्ड झाला हे दिसणार आहे. यासाठी संबंधित मेसेज स्वत: फॉरवर्ड करणे आवश्यक आहे. 

चार पेक्षा जास्त युजर्सना मेसेज फॉरवर्ड केल्यास त्याला 'Frequently Forwarded' टॅग असणार आहे. परंतु, या टॅगसहित असलेल्या मेसेजना फॉरवर्ड इन्फो फीचर उपलब्ध राहणार नाही. जुलै 2018 मध्येच या प्रक्रियेची सुरुवात झाली होती. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com