
Whatsapp New Features : जगातील सर्वात लोकप्रिय इंस्टंट मेसेजिंग अॅप ‘व्हॉट्सअॅप’ आता आणखी एका महत्त्वपूर्ण प्रायव्हसी फिचरची तयारी करत आहे. ३.५ अब्जाहून अधिक वापरकर्त्यांसाठी हे फिचर एक नवा टप्पा ठरणार आहे, ज्यामध्ये फोटो आणि व्हिडिओ शेअर करताना ते दुसऱ्याच्या फोनमध्ये आपोआप सेव्ह होणार नाहीत. सध्या हे फिचर चाचणी टप्प्यात असून लवकरच अॅपच्या येत्या अपडेट्समध्ये उपलब्ध होणार आहे.
आतापर्यंत व्हॉट्सअॅपवर पाठवले गेलेले फोटो आणि व्हिडिओ प्राप्तकर्त्याच्या फोनमध्ये आपोआप सेव्ह होत होते. त्यामुळे अनेकदा वैयक्तिक किंवा संवेदनशील मीडिया फाईल्सचा गैरवापर होण्याची शक्यता वाढत होती. पण आता नव्या फिचरमुळे वापरकर्त्यांना ही चिंता राहणार नाही.
या अपडेटनंतर, फोटो किंवा व्हिडिओ पाठवताना ‘ऑटो-सेव्ह’चा पर्याय अॉन/ऑफ करता येणार आहे. म्हणजेच, पाठवणाऱ्यालाच ठरवता येणार की संबंधित मीडिया फाईल प्राप्तकर्त्याच्या गॅलरीमध्ये सेव्ह व्हावी की नाही.
व्हॉट्सअॅपकडून नेहमीच चॅटिंग, व्हॉइस आणि व्हिडिओ कॉलिंगमध्ये सुधारणा केली जाते, पण यावेळी कंपनीने थेट डेटा सुरक्षेकडे लक्ष दिले आहे. वैयक्तिक माहिती, खाजगी फोटो आणि व्हिडिओ सुरक्षित ठेवण्यासाठी हे फिचर मोठी मदत करणार आहे.
प्रायव्हसीबाबत अधिक जागरूक असणाऱ्यांसाठी हे फिचर ‘गेम चेंजर’ ठरणार आहे. यामुळे अनावश्यक शेअरिंग, डेटा लीक किंवा चुकून फॉरवर्ड होणाऱ्या खाजगी फाइल्सपासून वाचता येणार आहे. विशेषतः जे वापरकर्ते आपल्या खासगी क्षणांची माहिती फक्त पाहण्यासाठी शेअर करतात, त्यांच्यासाठी हा पर्याय फारच उपयुक्त ठरेल.
व्हॉट्सअॅपने याची अधिकृत घोषणा केली नसली तरी विश्वसनीय स्रोतांनुसार, हे फिचर लवकरच सर्व वापरकर्त्यांसाठी उपलब्ध होण्याची शक्यता आहे. एकदा चाचणी यशस्वी झाली की, येत्या काही आठवड्यांत किंवा महिन्यांत हे अपडेट लाँच होईल.
व्हॉट्सअॅपवरील संवाद आणखी सुरक्षित, नियंत्रित आणि वापरकर्त्यांच्या हक्कांचे रक्षण करणारा ठरेल, अशी आशा या नव्या फिचरमुळे निर्माण झाली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.