
जगातील सर्वात लोकप्रिय मेसेजिंग अॅप व्हॉट्सअॅप आता जुन्या स्मार्टफोनसाठी आपला सपोर्ट थांबवत आहे. Meta कंपनीने अधिकृत घोषणा केली असून येत्या १ जून २०२५ पासून काही जुन्या iPhone आणि Android डिव्हाइसेसवर WhatsApp बंद होणार आहे. त्यामुळे असे फोन वापरणाऱ्यांना आता नव्या मोबाईलचा विचार करावा लागणार आहे
मेटने दिलेल्या माहितीनुसार, जुन्या ऑपरेटिंग सिस्टिमवर नवे फिचर्स, सुरक्षा अपडेट्स आणि चांगली सेवा देणे शक्य होत नाही. म्हणूनच कंपनीने हे मोबाईल आणि त्यांचे OS सपोर्टमधून हटवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे वापरकर्त्यांना नवीन मोबाईलवर स्विच करून डेटा सुरक्षित ठेवण्याची विनंती करण्यात आली आहे.
जर तुमच्याकडे iOS 15 किंवा त्याहून जुनी सिस्टिम असलेला iPhone असेल, तर १ जूननंतर WhatsApp वापरणे शक्य होणार नाही. खालील iPhone मॉडेलवर परिणाम होणार आहे
iPhone 5s
iPhone 6
iPhone 6 Plus
iPhone 6s
iPhone 6s Plus
iPhone SE
यापैकी बऱ्याच डिव्हाइसेसना iOS 16 किंवा त्याहून पुढील अपडेट मिळत नाही, त्यामुळे या फोनवर व्हॉट्सअॅप थांबेल.
ज्यांच्या फोनमध्ये Android 5.0 किंवा त्याहून जुनी सिस्टिम आहे, त्या Android युजर्सनाही WhatsApp बंद होणार आहे. यामध्ये हे लोकप्रिय मॉडेल्स समाविष्ट आहेत
Samsung Galaxy S4
Samsung Galaxy Note 3
Sony Xperia Z1
LG G2
Huawei Ascend P6
Moto G (1st Gen)
Motorola Razr HD
Moto E (2014)
तुमचा फोन या यादीत असेल किंवा जुनं OS चालू असेल, तर पुढील काही गोष्टी पटकन करा
नवीन स्मार्टफोन खरेदी करा iOS 16 किंवा Android 6.0 किंवा त्यापेक्षा पुढील OS असलेला फोन निवडा.
WhatsApp चॅट्सचं बॅकअप घ्या
Settings > Chats > Chat Backup > ‘Back Up Now’ वर टॅप करा.
iCloud (iPhone) किंवा Google Drive (Android) वर आपले मेसेज आणि मीडिया सुरक्षित ठेवा.
नव्या फोनवर Restore करा नवीन मोबाईलवर व्हॉट्सअॅप सेट करताना बॅकअपमधून चॅट हिस्टरी पुन्हा मिळवा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.