WhatsApp Trick: व्हॉट्सॲप चॅट्सवर डिजिटल पडदा टाकणारे एक भन्नाट ॲप

भारत आणि जगातील बहुतेक लोक व्हॉट्सॲप (WhatsApp) वापरतात.
WhatsApp Trick
WhatsApp TrickEsakal

भारत आणि जगातील बहुतेक लोक व्हॉट्सॲप (WhatsApp) वापरतात. हे प्राथमिक चॅटिंग ॲप म्हणून वापरले जाते. यावर आपण आपल्या मित्रांसोबत अनेक खाजगी गोष्टी शेअर देखील करतो. पण, जेव्हा आपण सार्वजनिक ठिकाणी बसलेलो असतो तेव्हा मात्र काही खाजगी गोष्टी शेअर करतांना समस्या येते.

कारण कधी कधी आपल्या शेजारी बसलेली व्यक्ती आपल्या फोनच्या स्क्रीनकडे एकटक पाहू लागते आणि नकळत पणे ती व्यक्ती आपल्या गप्पा वाचत असते. पण, तुम्ही आता या समस्येवर एक उपाय करू शकता.

WhatsApp Trick
Whatsapp Shopping : व्हॉट्सॲपवरून करा आता 'चॅटींग विथ शॉपिंग'; जिओमार्टची नवी सेवा

आजच्या लेखात आपण एका अशा ॲपविषयी माहिती जाणून घेणार आहोत जे तुमच्या व्हॉट्सॲपवर चॅटिंग करतांना व्हर्च्युअल पडदा (virtual screen on whatsapp) टाकेल. याने तुमच्या शेजारी बसलेल्याला व्यक्तीला कळणार नाही की, तुम्ही व्हॉट्सॲपवर चॅटिंगवर काय गप्पा मारताय?

WhatsApp Trick
व्हॉट्सॲप मेसेज दोन दिवसांनंतरही करता येईल डिलीट, येतंय नवीन फीचर

हे ॲप मोबाईल मध्ये कसे सुरू करावे?

हे ॲप डाऊनलोड करण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम Google Play Store वर जाऊन तुमच्या Android फोनवर MaskChat-Hides Chat नावाचे ॲप डाउनलोड करावे लागेल. त्यानंतर ते ॲप तुम्हाला जर का जाहिरातमुक्त हवे असेल तर त्यासाठी सबस्क्रिप्शन (Subscription for an ad-free experience) घ्यावे लागेल. हे ॲप तुमच्या चॅट्स लपवण्यात तुमची मदत करेल. सोप्या भाषेत, ते तुमच्या WhatsApp वर डिजिटल पडदा टाकते. यामुळे पुढच्या व्यक्तीला तुमच्या फोनची स्क्रीन दिसत नाही. याच्या मदतीने तुम्ही कोणत्याही टेन्शनशिवाय मित्रांशी गप्पा मारू शकता.

WhatsApp Trick
व्हॉट्सॲप स्टेटस देताना काळजी घेण्याचे आवाहन

व्हॉट्सॲप व्यतिरिक्त, हे ॲप इन्स्टाग्राम (instagram), फेसबुक (facebook) सारख्या इतर ॲपवर देखील काम करते. म्हणजेच लोकप्रिय मेसेजिंग ॲपमध्ये तुम्ही हे ॲप वापरू शकता. हे सेटअप करणे देखील खूप सोपे आहे. त्यासाठी आवश्यक त्या परवानग्या द्या. ॲप ओपन होताच तुम्हाला स्क्रीनवर फ्लोटिंग मास्क आयकॉन दिसेल. जेव्हा तुम्ही इतरांपासून स्क्रीन लपवू इच्छित असाल, तेव्हा ते चालू करण्यासाठी या फ्लोटिंग चिन्हावर क्लिक करा. यानंतर तुमच्या फोनच्या स्क्रीनवर डिजिटल स्क्रीन किंवा वॉलपेपर दिसेल. तुम्ही त्याचा फोटो किंवा आकार तुमच्यानुसार बदलू शकता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com