esakal | WhatsApp वापरताना या 5 गोष्टी लक्षात ठेवा, टळेल मोठे नुकसान

बोलून बातमी शोधा

Whatsapp
WhatsApp वापरताना या 5 गोष्टी लक्षात ठेवा, टळेल मोठे नुकसान
sakal_logo
By
रोहित कणसे

इन्स्टंट मेसेजिंग अ‍ॅप व्हॉट्सअ‍ॅप वापरताना वापरकर्त्यांना काही खास गोष्टींची काळजी घ्यायची गरज आहे. हे आपल्याला मोठ्या नुकसान होण्यापासून वाचवेलच, सोबतच आपला वैयक्तिक डेटा देखील सुरक्षित असेल. व्हॉट्सअ‍ॅप वापरकर्त्यांकडून काही सामान्य चुका केल्या जातात , ज्यामुळे वापरकर्त्यांना मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावे लागू शकते. अशा परिस्थितीत वापरकर्त्यांना या चुका पुन्हा पुन्हा केल्या जातात. आज आपण व्हॉट्सअ‍ॅप वापरकर्त्यांकडून केल्या जाणाऱ्या या चुकांबद्दल जाणून घेणार आहोत.

अज्ञात लोकांची नंबर सेव्ह करु नका

बर्‍याच वेळा आपण टॅक्सी, डिलिव्हरी बॉय किंवा कोणत्याही सेवा देणाऱ्या अज्ञात व्यक्तीचा फोन नंबर सेव्ह करतो आणि नंतर तो डिलीट करायला विसरतो. अशा परिस्थितीत ती व्यक्ती तुमचे प्रोफाईल पिक्चरपासून व्हॉट्सअ‍ॅपवरील स्टेटस पाहू शकते. अशा परिस्थितीत आपली माहिती त्या लोकांपर्यंत पोहोचते. म्हणूनच कधीही अज्ञात लोकांची नंबर सेव्ह करु नका.

Two step verification ऑन करा

हे व्हॉट्सअ‍ॅपचे एक अतिशय महत्त्वाचे फीचर आहे. आपल्याला टू स्टेप व्हेरिफीकेशन साठी 6-अंकी पिन सेट करावा लागेल. कोणत्याही नवीन डिव्हाइसमध्ये, या पिनसाठी आपल्या नंबरसह व्हॉट्सअ‍ॅपवर लॉग इन करणे आवश्यक असेल. तसेच, हा पिन मध्ये कधीही विचारला जाऊ शकतो. सायबर फसवणूकीच्या या युगात व्हॉट्सअ‍ॅपचे टू स्टेप व्हेरिफीकेशन ऑन केले जाणे आवश्यक आहे.

असे मॅसेज फॉरवर्ड करु नका

आपल्याला व्हॉट्सअॅपवर अनेक प्रकारचे मेसेजेस येतात. कोणतीही माहिती किंवा बातमी फॉरवर्ड करण्यापूर्वी, ती माहिती खरेअसल्याचे सुनिश्चित करा. याव्यतिरिक्त, अनेक बनावट लिंक्स देखील फ्री ऑफर आणि सरकारी योजनांच्या नावावर फॉरवर्ड केले जातात. त्यांना पुढे पाठवणे टाळा. तसेच, कोणत्याही धर्म किंवा समुदायाविरूद्ध द्वेषयुक्त संदेश पाठवू नका.

आपल्या व्हॉट्सअॅप प्रायव्हसी सेटिंग्ज तपासा

जेव्हा आपण स्टेटस टाकता तेव्हा ते प्रत्येकासोबत शेयर करू नका तर केवळ आपल्या मित्रांसह आणि कुटुंबातील सदस्यांसह शेयर करा. कारण आपल्या फोनमध्ये असंख्य नंबर असतात त्या सगळ्यांसोबत स्टेटस शेयर करण्याची गरज नाही.

ऑटो बॅकअप बंद करा

व्हॉट्सअ‍ॅपवर ऑटो-बॅकअपचे फीचर आहे, जे आपल्या मॅसेज बॅकअप Google ड्राइव्ह किंवा आयक्लॉडवर केले जाते. लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे येथे मॅसेज पोहोचल्यानंतर जर कोणी आपले Google किंवा Apple खाते हॅक केले तर ते आपली चॅट वाचू शकतात. म्हणूनच चॅट कायम सुरक्षित ठिकाणी एक्सपोर्ट करणे अधिक चांगले राहिल.