
पुणे : जर आपण व्हॉट्सअॅपवर टायपिंग करून कंटाळले असाल तर आज आम्ही तुम्हाला व्हॉट्सअॅपवर बोलून टेक्स्ट संदेश कसा पाठवू शकतो हे सांगणार आहोत. यासाठी आपल्याला कोणताही थर्ड पार्टी अॅप इंस्टॉल करण्याची आवश्यकता नाही, त्याऐवजी आपल्याकडे आधीपासूनच स्मार्टफोनमध्ये हे फिचक देण्यात आलेले आहे. ते ऑन करून आपण ते सहज वापरू शकतो
व्हॉईस टायपिंग फिचर वापरण्यासाठी ते आपल्या फोनमध्ये आधीपासून एक्टिवेट केले आहे की नाही ते तपासावे लागेल. खरंतरहे Google कीबोर्डचे फिचर आहे, जे बहुतेक Android स्मार्टफोनमध्ये आधीपासून चालू असतेच. ते तपासण्यासाठी व्हॉट्सअॅपवर जाऊन कोणताही चॅट बॉक्स उघडा. यानंतर कीबोर्डवर दिलेले स्पेस बटण दाबून धरा (ज्यावर इंग्रजी असे लिहिलेले आहे). यानंतर, बदललेला कीबोर्ड पर्याय स्क्रीनवर उघडेल, ज्यात तळाशी गूगल व्हॉईस टायपिंगचा पर्याय आहे. जर ते दिसत नसेल तर ते सेटिंग्ज वर जाऊन ते चालू करावे लागेल.
व्हॉईस टाईप फिचर ऑन करण्यासाठी
पहिल्यांदा तुम्हाला तुमच्या स्मार्टफोनच्या सेटिंग्जवर जावे लागेल. त्यानंतर भाषा आणि कीबोर्ड पर्याय निवडा आणि नंतर व्हर्च्यूअल कीबर्ड निवडा. यानंतर, मॅनेज कीबोर्ड हा पर्याय निवडा आणि तेथे आपल्याला व्हॉईस टायपिंगचा पर्याय मिळेल, ते टॅप करा.
व्हॉट्सअॅपवर मजकूर संदेश पाठविण्यासाठी
व्हॉट्सअॅपवर मजकूर संदेश पाठविण्यासाठी स्पेस बटण दाबा आणि धरून ठेवा. यानंतर, व्हॉइस टाईपिंग निवडा आणि आपला संदेश जो असेल तो बोला. बोलताना वेग कमी ठेवा आणि प्रत्येक शब्द स्पष्टपणे बोलण्याचा प्रयत्न कर. आपल्याला व्हॉईस मॅसेज हिंदीमध्ये टाइप करायचा असेल तर कीबोर्डच्या ऐवजी माइक चिन्हाच्या पुढे दिलेल्या सेटिंग्जच्या चिन्हावर क्लिक करा आणि हिंदी भाषा निवडा किंवा आपली पसंतीची भाषा निवडा. यानंतर, पुन्हा परत जा आणि जेव्हा आपण बोलून मजकूर संदेश टाइप कराल तेव्हा तो हिंदीत टाइप होताना दिसेल.
कीबोर्डमध्ये हिंदी भाषेचा समावेश कसा करायचा?
जर आपल्याला इंग्रजी कीबोर्डऐवजी हिंदी कीबोर्ड टाइप करायचे असेल तर त्यासाठी आपल्याला स्मार्टफोनच्या सेटिंग्जमध्ये जावे लागेल. तेथे भाषा आणि इनपुट पर्याय निवडा. यानंतर तुम्हाला भाषेचा पर्याय मिळेल, त्यावर क्लिक करा. त्यानंतर भाषा जोडा या पर्यायावर क्लिक करा आणि आपल्या पसंतीच्या भाषेचा शोध घ्या आणि ती भाषा आपल्या कीबोर्डमध्ये एॅड करा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.