

whatsapp web group voice video calls call links scheduling update 2026 marathi
esakal
Whatsapp Latest News : व्हॉट्सअॅप (WhatsApp) आपल्या वापरकर्त्यांचा अनुभव आणखी चांगला करण्यासाठी सतत नवनवीन प्रयोग करत आहे. या मालिकेतील पुढचे मोठे पाऊल म्हणजे व्हॉट्सअॅप वेब (WhatsApp Web) वरून ग्रुप व्हॉईस आणि व्हिडिओ कॉलिंगची सुविधा उपलब्ध करून देणे. आतापर्यंत ग्रुप कॉलिंगचे फीचर प्रामुख्याने मोबाईल ॲपपुरते मर्यादित होते, परंतु आता वेब ब्राउझरवर हे फिचर आल्यामुळे डेस्कटॉप किंवा लॅपटॉपवरून काम करणाऱ्या वापरकर्त्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. यामुळे मोठ्या स्क्रीनवर संवाद साधणे पूर्वीपेक्षा अधिक सुलभ आणि प्रभावी होईल.