WhatsApp Web मध्येही आता ऑडिओ आणि व्हिडिओ कॉलिंगची सुविधा

सकाळ ऑनलाईन
Sunday, 20 December 2020

फेसबुकच्या मालकीचे मॅसेजिंग ऍप व्हॉट्सऍपच्या डेस्कटॉप वर्जनमध्ये पुढील वर्षापासून ऑडिओ आणि व्हिडिओ कॉलिंगच्या सुविधा उपलब्ध होणार आहेत.

नवी दिल्ली- फेसबुकच्या मालकीचे मॅसेजिंग ऍप व्हॉट्सऍपच्या डेस्कटॉप वर्जनमध्ये पुढील वर्षापासून ऑडिओ आणि व्हिडिओ कॉलिंगच्या सुविधा उपलब्ध होणार आहेत. कंपनीच्या प्रवक्त्यांनी वृत्त संस्था रॉयटर्सला ही माहिती दिली आहे. मागील काही दिवसांपासून व्हॉट्सऍपच्या डेस्कटॉप वर्जनमध्ये ऑडिओ आणि व्हिडिओ कॉलिंगचे फिचर येणार असल्याची बातमी दिली जात होती. काही बीटा वापरकर्त्यांना हे फीचर रोलआउट झाल्याची बातमीही समजत आहे.  

व्हॉट्सऍप वेबमध्ये ऑडिओ आणि व्हिडिओ कॉलिंगच्या सुविधा उपलब्ध झाल्यास यामुळे व्हिडिओ कॉन्फ्रंसिंग ऍप Zoom आणि Google Meet यांना चांगली टक्कर मिळण्याची शक्यता आहे. जगभरात जवळजवळ 2 अब्ज लोक व्हॉट्सऍपचे वापरकर्ते आहेत. कंपनीने सांगितल्यानुसार काही दिवसांपूर्वीच ट्रायल बेसिस  डेस्कटॉप काही यूझर्संना देण्यात आले आहे. सर्वात आधी WABetaInfo यांनी ही माहिती दिली. 

मोदींना एक संधी द्या, 5 वर्षात 'सोनार बांगला' करुन दाखवू; अमित शहांची...

कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर जगभरातील लोकांनी घरुनच काम केलं. यावेळी एकमेकांशी संवाद साधण्यासाठी सोशल मीडिया ऍपचा वापर मोठ्या प्रमाणात करण्यात आला. व्हॉट्सऍपवर ऑडिओ आणि व्हिडिओ कॉलिंगच्या सुविधा उपलब्ध आहेत. पण, व्हॉट्सऍप वेबवर ही सुविधा नव्हती. आता मोठ्या स्क्रीनवर ऑडिओ आणि व्हिडिओ कॉलिंगच्या सुविधा मिळणे मोठी घटना आहे. 

Zoom Video Communications Inc ने शुक्रवारी जाहीर केले की,  हॉलिडे सीजन दरम्यान सर्व मीटिंगवर 40 मिनिटाचा टाईम-लिमिट हटवणार आहे. अशा प्रकारे Google Meet नेही आपले यूझर्ससाठी 60 मिनिटांची टाईम-लिमिट हटवण्याचा निर्णय घेतला.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: WhatsApp Web voice and video calls to desktop next year