

WhatsApp group chat showing the Recent History Sharing feature in action, displaying last 24 hours messages, photos, and files visible to new members with admin control highlighted
esakal
Whatsapp Recent History Sharing Feature : व्हॉट्सअॅप नेहमीच युजरचा अनुभव चांगला करण्यासाठी प्रयत्न करत असते. आता एक नवीन फीचर लोकांच्या पसंतीस उतरत आहे. पूर्वी व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये एखादा नवीन मेंबर अॅड झाला की त्याला कोरे चॅट दिसत होते. जुनी चर्चा काय झाली हे त्याला समजत नसे. मात्र नवीन फीचरमुळे आता नवीन सदस्यांना ग्रुपमध्ये अॅड होण्यापूर्वीचे मेसेजेस पाहता येणार आहेत, ज्यामुळे त्यांना संवादाचा संदर्भ समजणे सोपे होईल