'ही' सोपी ट्रिक वापरा आणि तुम्हाला आवडलेलं WhatsApp Status डाऊनलोड करा

whats app
whats app
Updated on

पुणे : आजकाल अनेकांच्या हातामध्ये स्मार्टफोन पाहावयास मिळतात. त्यात प्रत्येकजण व्हॉट्सअॅप वापरतच आहेत. नेहमी सोशल मीडियावरील होणारे अपडेटच्या बदलांसोबत अनेकजण ते बदल स्विकारतातच. त्यातील सध्या अनेकांना आवडणारे म्हणजेच व्हॉट्सअॅप स्टेटस. ते स्टेटस २४ तास राहतात आणि आपोआपच ते निघूनही जातो, हे सर्व आपल्याला माहितीच असेल बरोबर ना. पण तेच व्हॉट्सअॅप स्टेटस जर आपल्याला आवडले तर ते कसं डाउनलोड करायचे हे अनेकांना माहिती नाही. चला तर मग त्याच ट्रिक्सबद्दल आज आपण जाऊन घेऊयात. 

अनेकजण रोज न चुकता व्हॉट्सअॅप स्टेटस ठेवतात. फेसबुक, व्हॉट्सअॅप आणि इन्स्टाग्रामवर ही स्टेटस फिचर लोकप्रिय होत आहेत. व्हॉट्सअॅप स्टेटस सुरु झाल्यापासून अनेकजण स्वतःचे फोटो, व्हिडीओ, विचार, जोक्स असे अनेक स्टेटस म्हणून ठेवत आहेत. व्हॉट्सअॅप स्टेटस फिचर येऊन एक वर्ष झाले आहे. परंतु, तरीही या  व्हॉट्सअॅप स्टेटसचा ट्रेण्ड आणखीन कमी झालेल नाही. अजूनही हे फिचर युजर्सना फार आवडतंच आहे.

व्हॉट्सअॅप वर रोज न चुकता अनेकजण फोटो आणि व्हिडीओ स्टेटस म्हणून पोस्ट करत आहेत. यातील खास गोष्ट म्हणजे अशी आहे की, व्हॉट्सअॅप स्टेटस 24 तासांनी आपोआप निघून जातो. आपण नेहमीच व्हॉट्सअॅप ओपन केलं तर लगेच त्याचे स्टेटस पाहतोच. त्यात आपल्याला एखाद्या मित्र किंवा मैत्रिणीचे किंवा नातेवाईकांचे स्टेटस पाहून डाऊनलोड करण्याची इच्छा होतेच. अनेकजण त्यावेळी स्टेटस पाहतात आणि जर तो आवडल तर तो फोटो स्क्रिनशॉर्ट काढून सेव्ह केला जातो, परंतु व्हॉट्सअॅप स्टेटसचे व्हिडीओ डाऊनलड करणे शक्य होत नाही. त्याचे काही टिप्स आहेत ज्यांने तुम्ही स्टेटस सहज डाऊनलोड करू शकणार आहोत.

तुमच्या स्मार्ट फोनमधील त्या हिडन फोल्डरबाबत जिथे तुमच्या स्टेटसचे फोटो आणि व्हिडीओ आपोआप डाऊनलोड होतात. त्याच हिडन फोल्डरबाबत काही गोष्टी जाणून घेणार आहोत. आपल्या स्मार्टफोनमध्येच एक फोल्डर आहे. जिथे व्हॉट्सअॅप स्टेटसचे फोटो आणि व्हिडीओ डाऊनलोड करता येईल. जेव्हा तुम्ही कोणत्याही व्यक्तीच्या स्टेटसवर क्लिक करता. त्यावेळी तो फोटो आणि व्हिडीओ एका फोल्डरमध्ये डाऊनलोड होतो. सर्वात अगोदर तुम्हाला  स्टेटस फोल्डर अनहाइड करावं लागेल. स्टेटस फोल्डर अनहाइड करण्यासाठी फोन रिबूट किंवा आयओएस डिव्हाइसला जेलब्रेक करण्याची गरज तुम्हाला अजिबात नाही.
 
व्हॉट्सअॅप स्टेटसचे व्हिडीओ डाऊनलोड करण्यासाठी सुरुवातीला फाईल मॅनेजरमधील मेन्यू बारमध्ये जा. तिथे एक सेटिंग्सचं ऑप्शन दिसेल. त्या सेटिंग्सवर क्लिक केल्यानंतर एक अनहाईड फाइल्स (Unhide Files) चा ऑप्शन आहे. त्या अनहाइडवर क्लिक केल्यानंतर फाइल मॅनेजरमध्ये एक व्हॉट्सअॅप फोल्डर आहे, त्यावर क्लिक करा. त्यानंतर एक मीडिया (Media) फोल्डर पाहावयास मिळेल. त्या मीडिया फोल्डरमध्ये गेल्यानंतर आणखी एक स्टेटस नावाचं हिडन फोल्डर दिसेल. याच फोल्डरमध्ये तुम्ही पाहिलेले स्टेटसचे सर्व फोटो आणि व्हिडीओ सेव्ह करता येतात. अशापद्धतीने आता कोणतेही व्हॉट्सअॅप स्टेटस तुम्ही डाऊनलोड करू शकता. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com