कोबंडी आधी का अंडी? अखेर उत्तर मिळाले

सम्राट कदम
शनिवार, 17 ऑगस्ट 2019

कोंबडी आधी जन्माला आली का अंड? हा प्रश्न नेहमीच आपल्याला बुचकळ्यात पडतो. कित्येकदा मित्र-मैत्रिणींच्या घोळक्यात हा प्रश्न आपण एकमेकांना विचारला असेल. पण याचे समाधानकारक उत्तर आज पर्यंत तरी आपल्याला देता आले नाही. परंतु या यक्ष प्रश्नाचे उत्तर मिळवण्यास वैज्ञानिकांना मात्र यश आले आहे.

पुणे : कोंबडी आधी जन्माला आली का अंड? हा प्रश्न नेहमीच आपल्याला बुचकळ्यात पडतो. कित्येकदा मित्र-मैत्रिणींच्या घोळक्यात हा प्रश्न आपण एकमेकांना विचारला असेल. पण याचे समाधानकारक उत्तर आज पर्यंत तरी आपल्याला देता आले नाही. परंतु या यक्ष प्रश्नाचे उत्तर मिळवण्यास वैज्ञानिकांना मात्र यश आले आहे. या प्रश्नाचे उत्तर द्यायचा आजपर्यंत अनेकांनी प्रयत्न केला. जर कोणी कोंबडी आधी म्हटले, तर त्याला लगेच प्रतिप्रश्न केला जायचा 'कोंबडी कशातून जन्माला आली?' याचे उत्तर अंड्यातून असे असायचे!! तर मंग कोंबडी आधी कशी? आणि जर अंडे आधी म्हटले तर अंडे कशातून जन्माला आले? याचे उत्तर कोंबडी असे असायचे. त्यामुळे अंडी आधी का कोंबडी याचे उत्तर आपल्याला मिळत नसायचे.

मात्र, वैज्ञानिकांनी या गहन प्रश्नाचे उत्तर 'कोंबडीच आधी जन्माला आली !!" असे दिले आहे. याचे स्पष्टीकरण देताना त्यांनी म्हटले आहे की,"कोंबडीच आधी जन्माला आली आहे. उत्क्रांतीच्या कालखंडामध्ये पक्षांमध्ये झालेल्या जनुकीय अपघातातून कोंबडी प्रथम जन्माला आली. अंड्याच्या कावचासाठी लागणारे प्रथिने फक्त कोंबडीच निर्माण करू शकते." विज्ञान प्रसाराचे काम करणाऱ्या 'सायंटिफिक फॅक्ट' नावाच्या ऑनलाईन संकेतस्थळाने या उत्तराची पुष्टी केली आहे.

उत्क्रांतीच्या कालखंडामध्ये जनुकीय बादलातून अनेक सजीव जन्माला आले. त्यांच्या भोवतालच्या पर्यावरणीय गरजांनुसार त्यांनी स्वतःमध्ये बदल करून घेतले. ज्यांनी हे बदल केले नाही असे डायनोसॉर, आपले पूर्वज असलेल्या काही माकडाच्या प्रजाती आणि इतर सजीव कालांतराने नष्ट झाले. सुरवातीच्या कालखंडामध्ये प्रथम कोंबडी जन्माला आली आणि नंतर तिने अंड्यातून प्रजोत्पत्ती करायला सुरुवात केली. त्यामुळे कोंबडीच आधी!!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Which came first: the chicken or the egg?