
पर्प्लेक्सिटी एआयने गुगल क्रोम खरेदीसाठी ३,०२,१५२ कोटींची बोली लावली
ज्याने तंत्रज्ञान क्षेत्रात खळबळ उडवली.
क्रोम हा गुगलच्या इकोसिस्टमचा महत्त्वाचा भाग आहे.
Aravind Srinivas Perplexity AI : तंत्रज्ञान विश्वात खळबळ उडवणारी बातमी आहे. अवघ्या तीन वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या पर्प्लेक्सिटी एआय या स्टार्टअपने गुगलच्या क्रोम ब्राउझरसाठी तब्बल ३,०२,१५२ कोटी रुपये (३४.५ अब्ज डॉलर्स) ची बोली लावली आहे. २००८ मध्ये लाँच झालेला आणि जगातील सर्वाधिक वापरला जाणारा क्रोम ब्राउझर गुगलच्या रणनीतीचा अविभाज्य भाग आहे. या ऐतिहासिक बोलीमागील मास्टरमाइंड आहे भारतीय वंशाचे अरविंद श्रीनिवास, पर्प्लेक्सिटी एआयचे सीईओ आणि सहसंस्थापक..