Satyendra Bose : 'गॉड पार्टिकल'चे जनक म्हणून ओळखले जातात हे भारतीय वैज्ञानिक.. आईनस्टाईन देखील करायचे सलाम!

Father of God Particle : बोस यांनी आईन्स्टाईन, मॅडम क्यूरी यांच्यासह कित्येक मोठ्या वैज्ञानिकांसोबत काम केलं. याठिकाणी त्यांनी बोस-आईन्स्टाईन स्टॅटिस्टिकचा शोध लावला.
Satyendra Bose
Satyendra BoseeSakal

Satyendra Nath Bose God Particle : भारतातील प्रसिद्ध वैज्ञानिकांपैकी एक आदराने घेतलं जाणारं नाव म्हणजे सत्येंद्रनाथ बोस! बोस यांच्या थिअरीजचा अभ्यास करून कित्येक वैज्ञानिकांनी नोबेल पुरस्कार मिळवले. मात्र, विज्ञान क्षेत्रातील सर्वोच्च समजला जाणारा हा पुरस्कार बोस यांच्या नशिबी नव्हता. अर्थात, त्यांच्या कामाची दखल वेगळ्याच स्तरावर घेतली गेली. अगदी अल्बर्ट आईनस्टाईन देखील बोस यांच्या कार्यामुळे प्रभावित झाले होते.

ढाका युनिवर्सिटीमध्ये शिक्षण घेत असताना त्यांनी प्लँकचं क्वांटम रेडिएशन थिअरी मांडली होती. हा रिसर्च पेपर त्यांनी अल्बर्ट आईन्स्टाईन यांना पाठवला. त्यावेळी त्या शोधाचं महत्त्व ओळखून आईनस्टाईन यांनी त्याचा जर्मन भाषेत अनुवाद केला. तिथल्या प्रतिष्ठित विज्ञान विषयक नियतकालिकात बोस यांच्या नावानेच तो रिसर्च प्रसिद्ध करण्याचं कामही आईनस्टाईन यांनी केलं. (Albert Einstein and Satyendra Bose)

यानंतर बोस यांना युरोपला जाण्याची संधी मिळाली. त्यांनी आईन्स्टाईन, मॅडम क्यूरी यांच्यासह कित्येक मोठ्या वैज्ञानिकांसोबत काम केलं. याठिकाणी त्यांनी बोस-आईन्स्टाईन स्टॅटिस्टिकचा (Bose-Einstein Statistics) शोध लावला. आईन्स्टाईन यांनी बोस यांच्या थिअरीज अणुमधील विशिष्ट कणांचा शोध लावला. बोस यांच्या सन्मानार्थ या कणांना बोसोन पार्टिकल्स असं नाव देण्यात आलं.

Satyendra Bose
Isaac Newton : जादूटोण्याच्या मार्गाला लागला होता प्रसिद्ध वैज्ञानिक न्यूटन; शोधत होता 'परीस'.. पण का?

गॉड पार्टिकल

2012 साली जेव्हा गॉड पार्टिकलचा शोध लावण्यात आला, तेव्हादेखील त्यांना 'हिग्स-बोसोन' असं नाव देण्यात आलं. त्यावर्षी जुलैमध्ये याबाबत न्यूयॉर्क टाईम्समध्ये एक लेख प्रकाशित झाला होता. यामध्ये बोस यांना 'फादर ऑफ गॉड पार्टिकल' म्हटलं गेलं.

4 फेब्रुवारी 1974 रोजी सत्येंद्र बोस यांचं निधन झालं. त्यांच्या कित्येक थिअरीज आणि रिसर्चना त्यांच्या पश्चात प्रसिद्धी मिळाली. बोस यांना फिजिक्स सोबतच रसायनशास्त्र, भूगर्भशास्त्र, मानवशास्त्र आणि इतर विषयांमध्ये देखील रस होता.

Satyendra Bose
Stephen Hawking : जेव्हा जगातील महान वैज्ञानिकाने 'टाईम-ट्रॅव्हलर्स'साठी पार्टी ठेवली होती...

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com