Avtar Saini : 'इंटेल इंडिया'चे माजी प्रमुख अवतार सैनी यांचं अपघातात निधन; सायकलवरुन जात असताना टॅक्सीने दिली धडक

Intel India : अवतार हे 1982 ते 2004 पर्यंत इंटेल इंडियाचे प्रमुख होते. यादरम्यान त्यांनी इंटेल 386, इंटेल 486 आणि पेंटियम यांच्यासमवेत कित्येक प्रोसेसर डिझाईन करण्यात योगदान दिलं.
Avtar Saini
Avtar SainieSakal

Ex-Intel India Head Avtar Saini Accident : इंटेल कंपनीचे भारतातील माजी प्रमुख अवतार सैनी यांचं निधन झालं आहे. नवी मुंबईमध्ये सायकलवरुन जात असताना एका टॅक्सीने त्यांना धडक दिली. या अपघातामध्ये त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. अवतार यांनीच इंटेलच्या पेंटियम प्रोसेसरचं डिझाईन केलं होतं.

बुधवारी पहाटे सहाच्या सुमारास ते नेरुळ भागात सायकलिंग करत होते. यावेळी एका भरधाव टॅक्सीने मागून येत त्यांना धडक दिली. यानंतर आरोपी टॅक्सी चालकाने तिथून पळून जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी सायकल टॅक्सीमध्ये अडकल्यामुळे सैनीदेखील टॅक्सीसोबत काही अंतर फरपटत गेले. (Avtar Saini Accident)

या अपघातात गंभीर जखमी झालेल्या अवतार यांना जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आलं. याठिकाणी डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. या दरम्यान सैनी यांच्यासोबत असलेल्या इतर सायकल चालकांनी टॅक्सी ड्रायव्हरला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलं. या टॅक्सी चालकावर निष्काळजीपणाने वाहन चालवल्याबद्दल, आणि निष्काळजीपणामुळे जीव गेल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चालकाला अद्याप अटक केली नसल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Avtar Saini
Telegram Channels Monetization : आता 'टेलिग्राम चॅनल' करुन देणार बक्कळ कमाई; तुम्हीही करू शकता सुरू..

सैनी हे मुंबईच्या चेंबूर परिसरात एकटेच राहत होते. तीन वर्षांपूर्वीच त्यांच्या पत्नीचं निधन झालं होतं. त्यांचा मुलगा आणि मुलगी दोघेही अमेरिकेत राहतात. पुढील महिन्यातच ते आपल्या मुलांना भेटणार होते, मात्र त्यापूर्वीच त्यांचा अपघाती मृत्यू झाला. इंटेल इंडियाचे विद्यमान अध्यक्ष गोकुल व्ही. सुब्रमण्यम यांनी सैनींच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.

अवतार यांनी भारतात इंटेलचे आर अँड डी सेंटर (Intel R&D Center) उभारणीसाठी मोठं योगदान दिलं. ते एक प्रोलिफिक इन्व्हेंटर आणि उत्कृष्ट लीडर होते. एक व्हॅल्युएबल मॅनेजर म्हणून इंटेल त्यांना कायम स्मरणात ठेवेल, असं सुब्रमण्यम म्हणाले. अवतार हे 1982 ते 2004 पर्यंत इंटेल इंडियाचे प्रमुख होते. यादरम्यान त्यांनी इंटेल 386, इंटेल 486 आणि पेंटियम यांच्यासमवेत कित्येक प्रोसेसर डिझाईन करण्यात योगदान दिलं. (Intel Pentium)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com