तुमच्या पश्चात तुमच्या फेसबूक, ट्विटरचे काय होणार ? जाणून घ्या...

आपली समाजमाध्यमांवरील खाती आपल्या पश्चात कोण हाताळेल याची काही व्यवस्था आपण करून ठेवतो का ?
तुमच्या पश्चात तुमच्या फेसबूक, ट्विटरचे काय होणार ? जाणून घ्या...

मुंबई : आपल्या मृत्यूनंतर आपले बँक खाते आणि इतर संपत्ती कोणी हाताळावी याची तरतूद आपण आधीच करून ठेवलेली असते. पण आपली समाजमाध्यमांवरील खाती आपल्या पश्चात कोण हाताळेल याची काही व्यवस्था आपण करून ठेवतो का ? याआधी केली नसेल तर ही बातमी वाचल्यानंतर तुम्ही नक्कीच आपल्या समाजमाध्यमीय वारसदाराची नेमणूक कराल.

फेसबूक

फेसबूकवर तुमची वैयक्तिक छायाचित्रे आणि माहिती असते. त्यामुळे तुमच्या मृत्यूनंतर तुमचे खाते कोणी हाताळावे यासाठी वारसदार नेमण्याचा तसेच ते खाते डिलीट करण्याचा पर्याय देण्यात आलेला असतो.

यासाठी फेसबूकच्या सेटींगमध्ये जाऊन personal account information या पर्यायावर क्लिक करा. तिथे account ownership and controlचा पर्याय मिळेल. त्यानंतर account ownership and control मध्ये Memorialisationवर क्लिक करा. इथे Legacy Contact आणि Delete account after death हे पर्याय दिसतील. पहिल्या पर्यायाद्वारे तुम्ही तुमच्या पश्चात तुमचे खाते हाताळण्याचा अधिकार इतर कोणाला तरी देऊ शकता. दुसऱ्या पर्यायाद्वारे खाते कायमचे डिलीट होईल किंवा आठवण म्हणून राहील.

तुमच्या पश्चात तुमच्या फेसबूक, ट्विटरचे काय होणार ? जाणून घ्या...
समाजमाध्यम ठरतंय ‘दोघांत तिसरा’!

इन्स्टाग्राम

फेसबूक आणि इन्स्टाग्राम दोन्हींचे मालक मार्क झुकरबर्गच असल्याने दोन्हींची धोरणे एकच आहेत. http://surl.li/bzjcr या इन्स्टाग्राम हेल्प सेंटरवर तुमच्या कुटुंबियांपैकी कोणीही जन्मदाखला, मृत्यूचा दाखला अशी कागदपत्रे पुरवल्यास तुमचे खाते कायमचे नष्ट केले जाऊ शकते किंवा आठवण म्हणून ठेवले जाऊ शकते.

ट्विटर

ट्विटरला तुमच्या मृत्यूची माहिती मिळाल्यास तुमचे ट्विटर खाते डिलीट होते. तुमच्या कुटुंबातील एखादा सदस्य ट्विटर खाते डिलीट करण्याची विनंती पाठवू शकतो. यासाठी तुमचा मृत्यूचा दाखला द्यावा लागेल. त्यानंतर तुमच्या पोस्ट आणि छायाचित्रे, खाते डिलीट केले जाईल.

यूट्युब

या प्रक्रियेसाठी यूट्युबला एक लीगल कॉन्ट्रॅक्ट पाठवावे लागते. अन्यथा, ठरावीक कालावधीपर्यंत खाते वापरले न गेल्यास यूट्युबवरून ते डिलीट होते.

गुगल

गुगलवरील तुमचे खाते कधी डिलीट व्हावे हे तुम्हीच गुगलला कळवावे लागते. किती महिने खाते सक्रिय न राहिल्यास ते बंद व्हावे हे तुम्हीच सांगायचे असते. खाते बंद करण्याआधी गुगलकडून संदेश पाठवून खात्री करून घेतली जाते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com