

Why Smartphone Camera Quality Drops Over Time: 5 Main Reasons
esakal
Is Your Camera Sensor Damaged?: नवीन स्मार्टफोन खरेदी केल्यानंतर सुरुवातीला त्याच्या कॅमेऱ्यातून अतिशय शार्प, स्पष्ट आणि उत्तम रंगांचे फोटो येतात. पण, काही महिने किंवा वर्षे वापरल्यानंतर अनेकांची एकच तक्रार असते - "अरे, माझ्या फोनचा कॅमेरा आता आधीसारखे चांगले फोटो काढत नाही!"
फोटोंमधील स्पष्टता (Sharpness) कमी होणे, रंग उडाल्यासारखे दिसणे किंवा रात्रीच्या वेळी फोटोंमध्ये अस्पष्टता (Noise/Blurness) वाढणे अशा समस्या निर्माण होतात. पण, दरवेळी यामागे फोनचा कॅमेरा सेंसरच खराब झाला असेल असे नाही. मोबाईल कॅमेऱ्याची क्वालिटी कमी होण्यामागे काही महत्त्वाची तांत्रिक आणि व्यावहारिक कारणे असतात.