Life on Venus : पृथ्वीसारखाच आहे शुक्र ग्रह, मात्र तरीही त्यावर का नाही जीवन? शास्त्रज्ञांनी सांगितलं कारण

पृथ्वीसारखाच एक ग्रह आपल्या सूर्यमालेतच आहे. या ग्रहाला पृथ्वीची बहीण असेही म्हटले जाते.
Life on Venus
Life on VenuseSakal
Updated on

वैज्ञानिक नेहमीच पृथ्वीच्या बाहेर जीवसृष्टीचा शोध घेत असतात. यासोबतच मानवाला वसाहत करता येईल अशा ग्रहाचा ते शोध घेत असतात. खरंतर असा एक ग्रह आपल्या सूर्यमालेतच आहे. या ग्रहाला पृथ्वीची बहीण असेही म्हटले जाते. परंतु या ग्रहावर ना पृथ्वीसारखे जीवन आहे, ना जीवनाची अपेक्षा.

हा ग्रह म्हणजे शुक्र. पहाटेच्या वेळी आकाशात दिसणारा हा शुक्र ग्रह अगदी पृथ्वीप्रमाणेच आहे. मग तरीही या ग्रहावर जीवसृष्टी का नाही? नासाने नुकत्याच जारी केलेल्या एका व्हिडिओमध्ये याचं उत्तर दिलं आहे.

Life on Venus
Nasa : नासाच्या स्पेस टेलिस्कोपची कमाल; ३ दशकानंतर टिपले नेपच्यून ग्रहाचे तेजस्वी वलय

नासाचे प्लॅनेटरी सायंटिस्ट डॉ. अॅनी हॉफमन यांनी दिलेल्या माहितीनुसार, पृथ्वीचे सरासरी तापमान 60 फॅरेनहाइट म्हणजेच सुमारे 15 अंश सेल्सिअस आहे, तर शुक्राचे या तुलनेत तापमान खूपच जास्त आहे.

Life on Venus
First Woman in Space : आजच्या दिवशी घडला होता इतिहास! अंतराळात प्रथमच गेली महिला; जाणून घ्या सविस्तर

पृथ्वीच्या वातावरणात 78 टक्के नायट्रोजन आणि 20 टक्के ऑक्सिजन आहे, बाकीचे प्रमाण इतर वायूंचे आहे. विशेष म्हणजे येथे कार्बन डायऑक्साइड ग्रीन हाऊस गॅस म्हणून काम करतो. पृथ्वीवर पोहोचणाऱ्या सूर्याच्या उष्णतेपैकी कार्बन डायऑक्साईड फक्त काही उष्णता शोषून घेण्यास सक्षम असतो, बाकीची उष्णता ओझोनच्या थरामुळे येथे पोहोचत नाही आणि परावर्तित झाल्यानंतर परत येते.

आता शुक्राविषयी बोलायचे झाले तर पृथ्वीपेक्षा 2000 पट जास्त कार्बन डायऑक्साइड आहे. याशिवाय पृथ्वीच्या तुलनेत तो सूर्याच्या अधिक जवळ आहे. त्यामुळे तेथील तापमान 870 डिग्री फॅरेनहाइट म्हणजेच सुमारे 465 डिग्री सेल्सिअस आहे. शिवाय पृथ्वीला मिळालेलं ओझोन, आणि इतर वातावरणाचं सुरक्षा कवच शुक्राकडे नाही. त्यामुळेच या ग्रहावर जीवसृष्टी निर्माण होणं शक्य नाही.

Life on Venus
Technology Tips : पृथ्वीसारखा दुसरा ग्रह, या ग्रहावर मिळेल २००० वर्षांचं आयुष्य

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com