Wi-Fi Setting Tips : Wi-Fi चं स्पीड सारखंच गंडतंय? स्पीड वाढविण्यात 'या' भन्नाट टिप्स करतील तुमची मदत

Wi-Fi चं स्पीड गंडण्यात शेजाऱ्यांचा असेल हात?कसं ओळखाल
Wi-Fi  Setting Tips
Wi-Fi Setting Tipsesakal

WiFi Setting Tips : आजकाल ऑफीसमध्येच नाही तर  घराघरात WiFi बसवले जाते. घरातील मोबाईल वापरणाऱ्या सदस्यांची संख्या इतकी असते की वैयक्तिक इंटरनेट पॅक वापरण्यापेक्षा WiFi वापरणं सोप्प असतं.  घरी WiFi असेल तर बऱ्याचदा त्याचे स्पीड कमी होते.

WiFi चे स्पीड कमी असेल तर आपण कनेक्शन, नेटवर्कमध्ये प्रॉब्लेम आहे म्हणून ते चेक करतो. पण, तुमच्या WiFi चे नेट स्पीड कमी होण्यास तुमचे शेजारी, मित्र कारणीभूत ठरू शकतात. ते कसे हे आज आपण पाहुयात.

तुमचे शेजारी, मित्र तुमचा वाय-फाय दुसरा कोणी वापरत असेल आणि यामुळे तुमचा स्पीड कमी होऊ शकतो. अनेकदा आजूबाजूला राहणारे म्हणजे शेजारी करतात.

Wi-Fi  Setting Tips
Wifi Speed : कोण चोरतंय तुमच्या वाय-फाय इंटरनेटची स्पीड? 'या' ट्रिकने एका सेकंदात जाणून घ्या

तुमच्या Wi-Fi  चा वापर तुमच्यापासून लपवून कोण करत आहे हे आपण शोधू शकतो. त्यापासून सुटका देखील मिळवू शकता. यानंतर तुमचा इंटरनेट स्पीड पूर्ववत होतो.

जर तुमचा इंटरनेट स्पीड कमी असेल तर तुमचे इंटरनेट कोण वापरत आहे हे वेळोवेळी तपासून पाहावे. तसेच, आपण आपला वाय-फाय पासवर्ड नेहमीच सुरक्षित ठेवला पाहिजे. तसेच, फक्त आपले डिव्हाइस त्याला कनेक्ट केले पाहिजे.

आपल्या घरातील वाय-फायशी जोडलेली सर्व युजर्स पाहण्यासाठी, आपण प्रथम आपला वाय-फाय सेट करताना किंवा शेवटच्या वेळी पासवर्ड बदलताना वापरलेले राउटर अॅप लोड करणे आवश्यक आहे.

Wi-Fi  Setting Tips
Vodafone Idea ने लॉन्च केले पॉकेट WIFI, एकावेळी 10 डिव्हाईस करू शकता कनेक्ट

यासाठी, आपल्याला लॉगिन क्रेडेंशियल्सची आवश्यकता असेल, जी सहसा राउटरमध्येच आढळतात. राउटरच्या तळाशी एक Web Address देखील असतो. जो आपल्याला डिव्हाइसशी कनेक्ट करण्यास अनुमती देईल. जर तुमच्या राउटरमध्ये अॅप नसेल तर तुम्ही ब्राऊझरच्या माध्यमातून आवश्यक ती माहिती मिळवू शकता.

Wi-Fi Disconnect करा

यासाठी प्रथम लॉग इन करा. कनेक्टेड डिव्हाइस किंवा वायरलेस क्लायंट मेनूवर जा. जर आपल्या नेटवर्कवर एकाधिक वाय-फाय गॅजेट्स असतील तर त्यापैकी काही ओळखणे थोडे कठीण असू शकते. कारण त्या सर्वांना "आयफोन" किंवा "आयपॅड" सारखी सोपी नावे नसतील.

ते त्यांच्या डिव्हाइसचे नाव बदलू शकतात. हे करण्याचा सर्वात अचूक मार्ग म्हणजे सर्व उपकरणे डिस्कनेक्ट करणे. आवश्यकता भासल्यास, आपण कुटुंबातील सदस्यांचे डिव्हाइस पुन्हा कनेक्ट करू शकता आणि तुमच्या WiFi ला कनेक्ट असलेले सर्व युजर्स काढून टाकू शकता.

Wi-Fi  Setting Tips
तुमच्या घरातला WiFi राऊटर रात्रभर सुरूच असतो? वेळीच सावध व्हा नाहीतर...

Wi-Fi च्या राऊटरबाबतीत काय काळजी घ्यावी

राउटर उंच ठेवा: राउटरमध्ये त्यांचे सिग्नल खाली पसरवण्याची प्रवृत्ती असते. त्यामुळे कव्हरेज वाढवण्यासाठी राउटर शक्य तितक्या उंच माउंट करणे चांगले. ते एका उंच बुकशेल्फवर ठेवण्याचा प्रयत्न करा किंवा भिंतीवर लावा.

इलेक्ट्रॉनिक उपकरणे नसावी: उत्तम राउटर स्पीड हवा असल्यास एक गोष्ट आवर्जून लक्षात ठेवणे आवश्यक आहे. राउटर कायम इलेक्ट्रॉनिक्स आणि मोठ्या धातूच्या वस्तूंपासून दूर असलेले स्थान निवडण्याचा प्रयत्न करा. तुमच्या राउटरजवळील भिंती, मोठे अडथळे आणि इलेक्ट्रॉनिक्स सिग्नलमध्ये व्यत्यय आणतात.

Wi-Fi Booster : सर्वत्र वाय-फाय सिग्नल देण्यासाठी राउटर आणि डेड झोन दरम्यान वाय-फाय बूस्टर ठेवा. याशिवाय, पॉवरलाइन एक्स्टेंडर किटही वापरता येईल.

वाय-फाय सिग्नल अॅप वापरा: Android Users वायफाय विश्लेषक अॅपद्वारे वाय-फाय सिग्नल तपासू शकतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com