World Space Week : अंतराळातील प्रदूषण अन् कचरा वाढतोय; भावी पिढ्यांसाठी स्वच्छता गरजेची

Space Debris : पृथ्वीच्या बाहेरच्या कक्षेमध्ये विविध रॉकेट, यान आणि तुटलेल्या उपग्रहांचे तब्बल 12 कोटींहून अधिक तुकडे सध्या फिरत आहेत.
Space Debris WSW
Space Debris WSWeSakal

आजपासून जागतिक अंतराळ सप्ताहाला सुरूवात झाली आहे. मानवजातीने अंतराळात पार पाडलेल्या मोहिमांची आठवण आणि मिळवलेलं यश साजरं करण्यासाठी 4 ते 10 ऑक्टोबर या कालावधीमध्ये स्पेस वीकचं आयोजन करण्यात येतं.

इस्रो, नासा आणि जगभरातील इतर अंतराळ संशोधन संस्था मोठ्या प्रमाणात मोहिमा राबवत असतात. सध्या भारताच्या चांद्रयान 3 आणि आदित्यची सगळीकडे चर्चा सुरू आहे. जपाननेही चंद्राच्या दिशेने आपलं यान पाठवलं आहे, तर नासा आणि स्पेस-एक्स मिळून पुढील आठवड्यातच एक यान लाँच करणार आहेत.

Space Debris WSW
Earth from Space Station : रात्रीच्या वेळी अंतराळ स्थानकातून कशी दिसते पृथ्वी? विहंगमय दृष्य दाखवणारा व्हिडिओ समोर

जेव्हा एखादं यान लाँच केलं जातं, तेव्हा ते अंतराळात पाठवण्यासाठी रॉकेटची मदत घेतली जाते. कित्येक वेळा हे रॉकेट आपलं काम झाल्यानंतर खाली समुद्रात पडतं, तर कित्येक वेळा ते अंतराळातच तरंगत राहतं. याव्यतिरिक्त काम पूर्ण झालेले किंवा निकामी झालेले कित्येक उपग्रह देखील पृथ्वीभोवती असेच फिरत असतात. यालाच अंतराळातील कचरा म्हणतात.

संयुक्त राष्ट्रांच्या अंतराळातील गतिविधींवर लक्ष ठेवणाऱ्या संस्थेने एक आकडेवारी जाहीर केली आहे. यानुसार, जानेवारी 2022 पर्यंत पृथ्वीच्या भोवती 8,261 उपग्रह फिरत होते. यातील केवळ 4,852 उपग्रह सक्रिय होते. इतर उपग्रह बंद पडल्यामुळे केवळ जागा अडवून आहेत.

केवळ उपग्रहच नाही, तर पृथ्वीच्या बाहेरच्या कक्षेमध्ये विविध रॉकेट, यान आणि तुटलेल्या उपग्रहांचे तब्बल 12 कोटींहून अधिक तुकडे सध्या फिरत आहेत. केवळ पृथ्वीच्या भोवतीच नाही, तर चंद्राभोवती आणि चंद्राच्या पृष्ठभागावर देखील अशा प्रकारचा स्पेस कचरा आहे.

Space Debris WSW
India Space Station : आता अंतराळात असणार भारताचं स्वतःचं 'स्पेस स्टेशन'! काय आहे इस्रोची योजना?

उपाययोजना काय?

संयुक्त राष्ट्रांनी सर्व अंतराळ संस्थांना असे आदेश दिले आहेत, की एखादी अंतराळ मोहीम पूर्ण झाल्यानंतर 25 वर्षांच्या आत आपले उपग्रह किंवा यान पृथ्वीच्या कक्षेतून काढून घ्यावेत. याची अंमलबजावणी करणं कठीण आहे. मात्र, कंपन्यांनी तरीही यावर एक उपाय शोधला आहे.

मृत उपग्रहांना पृथ्वीच्या कक्षेतून खाली ओढून, पृथ्वीवर पाडणे हा उपाय कंपन्या राबवत आहेत. यामध्ये लहान उपग्रहांची निवड करण्यात येत आहे, जेणेकरून ते जमीनीपर्यंत पोहोचण्यापूर्वीच पृथ्वीच्या वातावरणाशी होणाऱ्या घर्षणामुळे जळून जातील.

Space Debris WSW
Space Station : इथला दिवस असतो फक्त 90 मिनिटांचा… इंटरनॅशनल स्पेस स्टेशन कसं असतं?

अंतराळ संशोधन क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढते आहे. कित्येक खासगी कंपन्याही आता या क्षेत्रात उतरत आहेत. तसंच, अंतराळ पर्यटनाची संकल्पनाही आता अस्तित्वात येत आहे. त्यामुळेच, पुढील पिढीसाठी आपल्याला आपण पसरून ठेवलेला कचरा स्वच्छ करणं गरजेचं आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com