World Telecommunication Day: दूरसंचार क्रांतीत सुरक्षा महत्त्वाची

World Telecommunication Day: दूरसंचार क्रांतीत सुरक्षा महत्त्वाची

सांगली : डिजिटल क्रांतीमुळे (Digital Revolution) जीवनच दूरसंप्रेषणावर आले आहे. वापरकर्त्याने स्वतः नियम घालून घेणे फायद्याचे ठरेल. ‘डिजिटल चोरी’बाबत जागृत राहायला हवं. सध्याची आव्हाने पाहता वापरकर्त्याने तिसऱ्या व्यक्तीपासून स्वतःला सुरक्षित ठेवणेच आव्हान आहे. १७ मे १८६३ रोजी इंटरनॅशनल टेलीकम्युनिकेशन सोसायटीची (International Telecommunication Society)स्थापना झाली. त्यानंतर ११० वर्षांनी जागतिक दूरसंचार दिन( World Telecommunication Day)साजरा केला जाऊ लागला. १७ मे १८६३ रोजी इंटरनॅशनल टेलीकम्युनिकेशन सोसायटीची स्थापना झाली. त्यानंतर ११० वर्षांनी जागतिक दूरसंचार दिन साजरा केला जाऊ लागला. दूरसंचार क्रांतीचा इतिहास प्रेरणादायी आहे.

World Telecommunication Day Special Article marathi news

भारतात दूरसंचार सेवेची सुरवात १८५० पासून प्रायोगिक तत्त्वावर विद्युत लाइन डायमंड हार्बर व कोलकत्ता दरम्यान सुरू झाली. सन १८५१ मध्ये ती ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीस खुली केली. टेलिग्राफपासून विकास झाला. १९८३ मधील ‘इन्सॅट’ भारतीय दूरसंचार क्षेत्रासाठी महत्त्वाचा मानला जातो. टेलिफोन, इंटरनेट, रेडिओ, टेलिव्हिजन व सॅटेलाईटमध्ये दुवा निर्माण केला. भारतात प्रथम १९९५ मध्ये इंटरनेट सेवा कोलकाता, चेन्नई, मुंबई व नवी दिल्ली येथेच सुरू झाली. आज ती प्रत्येकाच्या हाती आहे.

काही सेकंदात जगात कोठेही विचार-विनिमय, मते, भावना पाठवता येतात. जे दुवे वापरले जातात ते इलेक्ट्रॉनिक्स माध्यमांवर आधारित असतात. कृत्रिम उपग्रहांची भूमिकाही महत्त्वाची असते. ई-मेल, फॅक्स, इन्स्टंट मेसेजिंग, सॅटेलाइट, टेलिग्राफी, टेलिफोनी, टेलिव्हिजन ब्रॉडकास्टिंग ही माध्यमे आहेत. उपग्रह संप्रेषण, टेलीकॉन्फरन्सिंग, व्हिडिओ कॉन्फरन्सिंग हे प्रकार दूरसंचार सेवेचेच. पब्लिक स्ट्रिटचिंग इक्विपमेंट, ट्रान्समिशन इक्विपमेंट व कस्टमर प्रिमायसेस इक्विपमेंट उपकरणे गरजेची आहेत.

टेलिफोन लाईन्स विद्युतलहरी म्हणजेच ॲनालॉग संदेश पाठवतात व स्वीकारतात. दूरसंप्रेषण, दूरसंचारमुळे जग खेडे झाले. कोरोना साथीत दूरसंचार माध्यमाचे महत्त्व अधोरेखित होते. डिजिटल माध्यमांद्वारे दूरसंप्रेषणासाठी मोबाईल, संगणक व इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर, ब्राउजर ही भौतिक माध्यमे आहेत. ‘सर्चिंग’ सगळ्यांसाठी महत्त्वाचे झाले आहे. शैक्षणिक, औद्योगिक, राजकीय, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय व्यवहार, आर्थिक, मनोरंजन क्षेत्रात या सेवेने प्रगतीचे शिखर गाठलेय. सरकारी बीएसएनएलसह सेवा देणाऱ्या अनेक कंपन्या आहेत.

सुरक्षेबाबत सर्व दूरसंप्रेषण माध्यमे पूर्णत: खात्री देऊ शकत नसली तरी स्वसुरक्षा स्वहाती आहे. डिजिटल साधने सुरक्षित ठेवण्याचे उपाय माहिती असावेत. संसाधने ‘वापरण्याचा हेतू’ महत्त्वाचा. ई-स्कूल, ई-लायब्ररी, ई-चॅटिंगसारख्या सुविधा घरबसल्या मिळतात. अपलोडिंग, डाउनलोडिंग, सर्चिंगमुळे विचार जगाच्या या कोपऱ्यातून त्या कोपऱ्यात पोहोचतात. खरे तर जीवनच दूरसंप्रेषणावर आले. वापरकर्त्याने स्वतः काही नियम घालून घेणे फायद्याचे. ‘डिजिटल चोरी’बाबत जागरूक राहायला हवं. सुरक्षित व विश्वसनीय सेवा, वाढती डिजिटल मागणी व पारदर्शकता, नवीन तंत्रज्ञान विकास, नवविचारांच्या कंपन्या, निर्णय क्षमता, माहिती तंत्रज्ञानातील अपग्रेडिंग, उच्च क्षमतेचे इंटरनेट, कृत्रिम बुद्धिमत्ता व तंत्रज्ञानात्मक बदल, वापरकर्त्याला तिसऱ्या व्यक्तीपासून स्वतःला सुरक्षित ठेवणे हीच सध्याची आव्हाने आहेत.

डॉ. नगिना माळी

World Telecommunication Day Special Article marathi news

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com