Data Leak : इंटरनेटवरील १६ अब्ज ‘पासवर्ड’ उघड; जगभरातील लाखो जणांची गोपनीय माहिती धोक्यात
Cyber Security Threat : संपूर्ण जगभरातील १६ अब्ज इंटरनेट खाते माहिती लीक झाली असून, हॅकिंगचा धोका वाढला आहे. ही माहिती जुनीच नाही, तर मालवेअरने चोरलेली नविन माहिती देखील यात समाविष्ट आहे.
वॉशिंग्टन : जगभरातील १६ अब्ज इंटरनेट खात्यांची गोपनीय माहिती उघड झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे लाखो वापरकर्त्यांची इंटरनेटशी संबंधित माहिती धोक्यात आली असून, त्यातून जगभरात हॅकिंग आणि ऑनलाइन गैरप्रकार वाढण्याची भीती आहे.