WWDC 2024 AirPods Pro : नुसत्या हावभावाने होणार लाँग डिस्टन्सची कामे, Siri करणार कमाल;गेमर्ससाठीही ॲपलचे लाँच सरप्राईज,जाणून घ्या

WWDC 2024 : कंपनीने केलीये मोठ्या लाँचची घोषणा,वायरलेस इअरफोन्सच्या क्षेत्रात आघाडी
Apple Enhances AirPods Pro 2 with Gesture Siri and Voice Isolation
Apple Enhances AirPods Pro 2 with Gesture Siri and Voice Isolationesakal

Apple : ॲपलने आपल्या वर्ल्डवाइड डेव्हलपर्स कॉन्फरन्स (WWDC) 2024 मध्ये एअरपॉड्सच्या नवीन आवृत्तींबद्दल मोठी घोषणा केली आहे. यात सर्वात आकर्षक म्हणजे एअरपॉड्स प्रो (2nd Gen) (AirPods Pro 2)ची सिरीशी हावभावाने संवाद साधण्याची क्षमता! होय, तुम्ही आता सिरीला तोंड हलवून होकार आणि डोके हलवून नकार देऊ शकता. गर्दीच्या ठिकाणी किंवा शांत वातावरणात असताना हा फीचर खूप उपयुक्त ठरेल.

या नवीन H2 चिपसेटने चालणाऱ्या एअरपॉड्स प्रोमध्ये आणखीही काही खास गोष्टी आहेत. gesture-based Siri interactions द्वारे तुम्ही फोन कॉलची उत्तरे देऊ शकता, कॉल कट करू शकता, मेसेज नियंत्रित करू शकता आणि सूचनांशी संवाद साधू शकता.

एवढंच नाही तर, एअरपॉड्स प्रो(2nd Gen) मध्ये आता व्हॉइस आयसोलेशन फीचरही मिळणार आहे. हे फीचर आधीपासून iPhone, iPad आणि मॅकवर उपलब्ध आहे. हे कॉल दरम्यान बॅकग्राउंडचा आवाज कमी करून तुमचा आवाज अधिक स्पष्ट करते.

Apple Enhances AirPods Pro 2 with Gesture Siri and Voice Isolation
Ayurvedic Herbs Brain Health : मेंदूच्या आरोग्यासाठी 4 आयुर्वेदिक वनस्पती

गेमर्ससाठीही यावेळी ॲपलने खास सरप्राईज दिले आहे. आता अनेक एयरपॉड्स मॉडेल्ससाठी पर्सनलाइज्ड स्पॅशियल ऑडिओ फीचर येत आहे. हे फीचर गेम खेळताना डायनॅमिक हेड ट्रॅकिंगसह येते. त्यामुळे गेम खेळण्याबरोबरच संगीत ऐकताना, चित्रपट पाहतानाही तुम्हाला एक अजून मजेदार अनुभूती मिळणार आहे.

Apple Enhances AirPods Pro 2 with Gesture Siri and Voice Isolation
Elon Musk on Apple : ॲपलसोबत OpenAI च्या युतीमुळे इलॉन मस्क संतापले, मोठा निर्णय घेणार? नेमकं काय आहे प्रकरण?

एअरपॉड्स प्रो 2nd Gen (AirPods Pro 2)वापरणारे गेमर्स iPhoneवर गेम खेळताना आता कमी ऑडिओ लेटेन्सीचा अनुभव घेऊ शकतात. इतकेच नाही तर, गेमच्या सर्व्हर्सद्वारे सहकारी खेळाडूंशी बोलताना 16-bit, 48KHz ऑडिओ क्वालिटीही मिळणार आहे.

ॲपलच्या या नवीन घोषणांमुळे आगामी काळात वायरलेस इअरफोन्सच्या क्षेत्रात एअरपॉड्सची आघाडी अधिक वाढण्याची शक्यता आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com