X See Similar : आता 'एक्स' वापरण्याची मजा आणखी वाढणार; इलॉन मस्कने लाँच केलं 'एआय' आधारित खास फीचर

X New Feature : एक्सला 'एव्हरिथिंग अ‍ॅप' बनवण्याचा इलॉन यांचा प्रयत्न आहे.
X See Similar Feature
X See Similar FeatureeSakal

इलॉन मस्कने विकत घेतल्यापासून एक्स (आधीचे ट्विटर) या अ‍ॅपमध्ये कित्येक बदल करण्यात आले आहेत. आता मस्कने यात आणखी एका नवीन फीचरची घोषणा केली आहे. 'See Similar Post' असं हे नवीन फीचर असणार आहे. हे फीचर एआयवर आधारित आहे.

एक्सला 'एव्हरिथिंग अ‍ॅप' बनवण्याचा इलॉन यांचा प्रयत्न आहे. यासोबतच एक्स वापरण्याचा यूजर्सचा अनुभव आणखी चांगला व्हावा यासाठी देखील मस्क कित्येक नवीन फीचर्स लाँच करत असतात. यासाठीच हे नवीन फीचर आणलं आहे.

काय आहे फीचर?

'सी सिमिलर' या फीचरमुळे आता यूजर्सना एकाच विषयाच्या पोस्ट एक्सवर पाहता येणार आहेत. म्हणजे तुम्ही एखाद्या विषयावरील पोस्ट पाहत असाल, आणि तुम्हाला त्यासंबंधी इतर पोस्ट पहायच्या असतील; तर हा पर्याय तुमची मदत करेल.

X See Similar Feature
Chandrasekhar Elon Musk : 'माझ्या मुलाचं मधलं नाव चंद्रशेखर', इलॉन मस्कने दिली माहिती; केंद्रीय मंत्री झाले चकित

एकाच प्रकारच्या पोस्ट दाखवण्यासाठी एआयची मदत घेण्यात येणार आहे. यामुळे यूजर्सना केवळ आपल्याला हव्या असणाऱ्या विषयावरील पोस्ट पाहणं शक्य होणार आहे. त्यामुळे यूजर्सचा एक्स वापरण्याचा अनुभव आणखी पर्सनलाईज्ड होणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com