
ठरलं तर! भारतात या दिवशी लॉंच होणार Xiaomi 11i; पाहा डिटेल्स
स्मार्टफोन कंपनी Xiaomi येत्या नवीन वर्षाची धमाकेदार सुरुवात करण्याच्या तयारीत असून नवीन वर्षात कंपनी Xiaomi 11i सीरीज लॉन्च करणार आहे, हा भारतीय बाजारपेठेतील आतापर्यंतचा सर्वात फास्ट चार्जिंग फोन असेल. Xiaomi 11i हा स्मार्टफोन येत्या 6 जानेवारी 2022 रोजी भारतात लॉन्च होणार आहे. Xiaomi ने यासाठी मीडिया इनव्हाइट पाठवण्यास सुरुवात केली आहे.
Xiaomi ने या चार्जरला Hypercharge असे नाव दिले आहे. Xiaomi इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक मनु कुमार जैन यांनी ट्विट करत माहिती दिली आहे की 120W हायपरचार्जर केवळ 15 मिनिटांत स्मार्टफोन पूर्णपणे चार्ज करेल, मात्र त्यांनी फोनच्या बॅटरीच्या क्षमतेबद्दल कोणतीही माहिती दिली नाही.
X Xiaomi 11i सीरीज मध्ये Xiaomi 11i Hypercharge आणि Xiaomi 11i लॉंच केले जातील. फोनची मायक्रोसाइटही लॉन्च करण्यात आली आहे. Xiaomi 11i हायपरचार्ज मध्ये ग्राहकांना 8 GB रॅम आणि 128 GB स्टोरेज ऑफर केला जाऊ शकते. हा फोन कॅमो ग्रीन आणि स्टेल्थ ब्लॅक कलरमध्ये लॉन्च केला जाईल
Xiaomi 11i हायपरचार्ज हा स्मार्टफोन चीनमध्ये ऑक्टोबर महिन्यात लॉंच झालेल्या Redmi Note 11 Pro+ ची रिर्ब्रँडेड आवृत्ती असेल. याच्या स्पेसिफिकेशनबद्दल बोलायचे झाले तर Xiaomi 11i हायपरचार्जचे फीचर्स Redmi Note 11 Pro+ सारखे असू शकतात. Xiaomi 11i हायपरचार्ज या स्मार्टफोनमध्ये 120Hz च्या रिफ्रेश रेटसह 6.67-इंचाचा AMOLED डिस्प्ले मिळू शकतो. तसेच यामध्ये 108 मेगापिक्सेलची प्रायमरी लेन्स सोबत ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप मिळू शकतो. फोनमध्ये JBL चा ड्युअल स्पीकर देखील असेल.