Xiaomi 12 सीरीजचे तीन नवे स्मार्टफोन लॉन्च, काय आहेत फीचर्स? वाचा

xiaomi 12 series smartphone launched with xiaomi 12 pro know all specification price latest news
xiaomi 12 series smartphone launched with xiaomi 12 pro know all specification price latest news

Xiaomi 12 series smartphone launched : शाओमीची Xiaomi 12 सीरीज लॉन्च झाली आहे. Xiaomi 12 सीरीज अंतर्गत तीन स्मार्टफोन लॉन्च करण्यात आले असून, ज्यात Xiaomi 12, Xiaomi 12 Pro आणि Xiaomi 12X यांचा समावेश आहे. Xiaomi 12 सीरीज फोनमध्ये पंचहोल डिस्प्ले देण्यात आला आहे. याशिवाय सर्व फोनवर कॉर्निंग गोरिल्ला ग्लास विक्टस देण्यात आले असून तिन्ही फोनमध्ये तीन रियर कॅमेरे आणि 5G कनेक्टिव्हिटी देण्यात आली आहे. Xiaomi 12 सीरीज व्यतिरिक्त कंपनीने MIUI 13 देखील लॉन्च केला आहे. MIUI 13 सह फेस व्हेरिफिकेशन प्रोटेक्शन देखील मिळेल, याशिवाय अनेक प्रकारचे प्रायव्हसी फीचर्स देखील यामध्ये देण्यात आले आहेत.

Xiaomi 12, Xiaomi 12 Pro, Xiaomi 12X ची किंमत

Xiaomi 12 ची सुरुवातीची किंमत 3,699 चीनी युआन म्हणजेच सुमारे 43,400 रुपये आहे, म्हणजेच या किमतीत तुम्हाला 8 GB RAM सह 128 GB स्टोरेज व्हेरिएंट मिळेल. दुसरा व्हेरिएंट हा 256 GB स्टोरेजसह 8 GB रॅम आहे, ज्याची किंमत 3,999 चीनी युआन म्हणजे सुमारे 46,900 रुपये आहे. 12 जीबी रॅमसह 256 जीबी स्टोरेजच्या टॉप मॉडेलची किंमत 4,399 युआन म्हणजे सुमारे 51,600 रुपये आहे. त्याच वेळी, Xiaomi 12 Pro ची किंमत 4,699 युआन म्हणजे सुमारे 55,100 रुपयांपासून सुरु होते आणि Xiaomi 12X ची किंमत 3,199 युआन म्हणजे सुमारे 37,500 रुपयांपासून सुरु होत आहे.

Xiaomi 12 चे स्पेसिफिकेशन

Xiaomi 12 मध्ये Android आधारित MIUI 13 देण्यात आले आहे. याशिवाय, यात 6.28-इंचाचा फुल एचडी प्लस एमोलेड डिस्प्ले आहे, ज्याचे रिझोल्यूशन 1080x2400 पिक्सेल असून डिस्प्ले कॉर्निंग गोरिल्ला ग्लास व्हिक्टसद्वारे संरक्षित आहे. डिस्प्लेची ब्राइटनेस 1,100 nits आणि रीफ्रेश रेट 120Hz आहे. डिस्प्लेसह डॉल्बी व्हिजन सपोर्ट देखील दिला आहे. फोनमध्ये Snapdragon 8 Gen 1 प्रोसेसर असून, 12 GB पर्यंत LPDDR5 RAM आहे.

कॅमेर्‍याबद्दल बोलायचे झाल्यास, तीन रियर कॅमेरे आहेत ज्यात प्रायमरी लेन्स 50-मेगापिक्सलचा Sony IMX766 सेन्सर आहे, ज्याचा अपर्चर f/1.88 आहे. यात ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायझेशन देखील देण्यात आले आहे. दुसरी लेन्स 13 मेगापिक्सेल अल्ट्रा वाईड आहे आणि तिसरी लेन्स 5 मेगापिक्सेल मॅक्रो आहे. रिअर कॅमेऱ्याला सायबर फोकस टेक्नोलॉजी सोपोर्ट दिला आहे. सेल्फीसाठी 32-मेगापिक्सेल कॅमेरा मिळेल.

कनेक्टिव्हिटीसाठी, फोनमध्ये 5G, 4G LTE, Wi-Fi 6E, ब्लूटूथ v5.2, GPS/ A-GPS, NFC, इन्फ्रारेड (IR) आणि USB Type-C पोर्ट आहे. स्पीकर सोबतच डॉल्बी अॅटमॉस आणि हार्मन कार्डन सपोर्ट दिला आहे. यात 4500mAh बॅटरी 67W फास्ट चार्जिंगसाठी सपोर्ट मिळणार असून यासोबत, 50W वायरलेस चार्जिंगसाठी देखील सपोर्ट आहे.

xiaomi 12 series smartphone launched with xiaomi 12 pro know all specification price latest news
Upcoming Cars 2022 : नव्या वर्षात लॉंच होणार 'या' दमदार SUV

Xiaomi 12 Pro चे स्पेसिफिकेशन

Xiaomi 12 Pro मध्ये MIUI 13 उपलब्ध असेल. यात 1440x3200 पिक्सेल रिझोल्यूशनसह 6.73-इंचाचा WQHD+ E5 AMOLED डिस्प्ले, डिस्प्लेची ब्राइटनेस 1,500 nits आहे. सुरक्षेसाठी यात गोरिल्ला ग्लास व्हिक्टस देखील आहे. यात लो टेम्परेचर पॉलीक्रिस्टलाइन ऑक्साइड (LTPO) बॅकप्लेन तंत्रज्ञान आहे जे Apple त्याच्या प्रीमियम iPhones मध्ये वापरले जाते. Xiaomi 12 Pro मध्ये Snapdragon Snapdragon 8 Gen 1 प्रोसेसर, 12 GB LPDDR5 RAM आणि 256 GB स्टोरेज देखील आहे.

Xiaomi 12 Pro मध्ये तीन कॅमेरे देखील आहेत, ज्याचा पहिली लेन्स 50-megapixel Sony IMX707 सेन्सर आहे. यासह OIS सपोर्ट मिळेल आहे. दुसरी लेन्स देखील 50 मेगापिक्सेल पोर्ट्रेट आणि तिसरी लेन्स 50 मेगापिक्सेल अल्ट्रा वाइड आहे. सेल्फीसाठी यात 32-मेगापिक्सेल कॅमेरा देखील आहे.

कनेक्टिव्हिटीसाठी, फोनमध्ये 5G, 4G LTE, Wi-Fi 6E, ब्लूटूथ v5.2, GPS/ A-GPS, NFC, इन्फ्रारेड (IR) आणि USB Type-C पोर्ट आहे. स्पिकरसोबत डॉल्बी अॅटमॉस आणि हार्मन कार्डन सपोर्ट मिळतो. यामध्ये 120W फास्ट चार्जिंगसाठी सपोर्ट असलेली 4600mAh बॅटरी आहे. यासोबतच 50W वायरलेस आणि 10W रिव्हर्स चार्जिंगसाठीही सपोर्ट आहे.

xiaomi 12 series smartphone launched with xiaomi 12 pro know all specification price latest news
जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात लॉन्च होतील 'हे' स्मार्टफोन, पाहा यादी

Xiaomi 12X चे स्पेसिफिकेशन

Xiaomi 12X मध्ये MIUI 13 देण्यात आले आहे. याशिवाय, यात 6.28-इंचाचा फुल एचडी प्लस एमोलेड डिस्प्ले आहे, ज्याचे रिझोल्यूशन 1080x2400 पिक्सेल आहे. डिस्प्ले कॉर्निंग गोरिल्ला ग्लास व्हिक्टस संरक्षिण मिळते. डिस्प्लेची ब्राइटनेस 1,100 nits आहे आणि रीफ्रेश रेट 120Hz आहे. डिस्प्लेसह डॉल्बी व्हिजन सपोर्ट देखील आहे. फोनमध्ये Snapdragon 870 प्रोसेसर दिले असून, 12 GB पर्यंत LPDDR5 RAM आहे.

कॅमेर्‍याबद्दल बोलायचे झाल्यास, तीन रियर कॅमेरे आहेत ज्यात प्रायमरी लेन्स 50-मेगापिक्सलचा Sony IMX766 सेन्सर आहे, ज्याचा अपर्चर f/1.88 आहे. यात ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायझेशन देखील आहे. दुसरी लेन्स 13 मेगापिक्सेल अल्ट्रा वाईड आहे आणि तिसरी लेन्स 5 मेगापिक्सेल मॅक्रो आहे. मागील कॅमेऱ्यासाठी सायबर फोकस टेक्नोलॉजी दिली आहे . सेल्फीसाठी 32-मेगापिक्सेल कॅमेरा उपलब्ध असेल.

कनेक्टिव्हिटीसाठी, फोनमध्ये 5G, 4G LTE, Wi-Fi 6E, ब्लूटूथ v5.2, GPS/ A-GPS, NFC, इन्फ्रारेड (IR) आणि USB Type-C पोर्ट आहे. डॉल्बी अॅटमॉस आणि हार्मन कार्डन यांना स्पीकरने सपोर्ट केला आहे. यात 4500mAh बॅटरी 67W फास्ट चार्जिंगसाठी सपोर्ट आहे. यासोबत, 50W वायरलेस चार्जिंगसाठी देखील सपोर्ट आहे.

xiaomi 12 series smartphone launched with xiaomi 12 pro know all specification price latest news
रेडमीचा 5G फोन भारतात लॉंच; स्वस्तात मिळतायेत भन्नाट फीचर्स

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com